गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर तुम्ही किती वेळा करता?

By admin | Published: July 3, 2017 04:19 PM2017-07-03T16:19:32+5:302017-07-03T16:19:32+5:30

त्यामुळे नको असलेली गर्भधारणा तर टळेल, पण ब्रेस्ट कॅन्सर झाला तर?.. काळजी घ्या..

How often do you use contraception tablets? | गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर तुम्ही किती वेळा करता?

गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर तुम्ही किती वेळा करता?

Next

- मयूर पठाडे

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि महिलांच्या केवळ आरोग्यावरच नव्हे, तर त्यांच्या पूर्ण आयुष्यावरच प्रभाव टाकणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांनी एका अर्थानं जगभरात क्रांतीच केली. केवळ काही गोळ्या घेऊन नको असलेली गर्भधारणा टाळता येऊ शकत असल्यानं जगभरातील अनेक महिलांसाठी या गोळ्या म्हणजे सोन्याची किल्लीच ठरली. जगभरातील कोट्यवधी महिला या गोळ्या घेतात आणि नको असलेली संतती टाळतात. सध्या तरी संतती प्रतिबंधासाठी हा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा उपाय मानला जातो.. मात्र शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासानंतर अशा गोळ्या घेणाऱ्या महिलांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
या गर्भनिरोधक गोळ्यांचा तुम्ही जर सातत्यानं वापर करीत असाल, तर तुमच्यात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे!

 

 


शास्त्रज्ञांनी यासाठी अशा अनेक महिलांच्या रक्ताचे नमुने तपासले, ज्या बर्थ कंट्रोल पिलचा उपयोग करतात. या अभ्यासात त्यांच्या लक्षात आलं, गोळ्या घेणाऱ्या महिलांच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात हार्मोन्स तयार होतात, जे ब्रेस्ट कॅन्सरच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतात.
महिलांच्या शरीरात ा्रोजेस्टिन हार्मोन्सचं प्रमाण या गोळ्यांमुळे वाढतं आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका तब्बल चार पटींनी वाढतो.
त्यामुळे तुम्ही जर गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर सातत्यानं आणि खूप काळपर्यंत करीत असाल, तर काळजी घ्या, वेळच्यावेळी आपली नियमित तपासणीही करून घ्या, असा शास्त्रज्ञांचा सल्ला आहे.

Web Title: How often do you use contraception tablets?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.