सावधान! ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय 'या' आजाराचा धोका; पालकांनो 'अशी' काळजी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 05:54 PM2020-07-20T17:54:57+5:302020-07-20T18:02:24+5:30
डिजीटल शिकवण्यांमुळे मुलांचा अभ्यास जरी होत असला तरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कोरोना व्हायरसमुळे लोकांसमोर अनेक नवीन आव्हानं आली आहेत. सध्याच्या स्थिती आधीसारखे सामान्य कामकाज करू शकत नाही. अशा स्थितीत मुलांच्या अभ्यासाबाबत मोठ प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. डिजीटल शिकवण्यांमुळे मुलांचा अभ्यास जरी होत असला तरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. चिडचिड करणं, मानसिक आरोग्य खराब होणं. डोळ्यांवर ताण पडणं अशा समस्या लक्षात घेता. मानव संसाधन विकास मंत्रालयाने डिजिटल शिक्षणाबाबत काही गाईडलाईन्स दिल्या आहेत.
मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार प्री- प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्सासेसची वेळ ३० मिनिटांपेक्षा जास्त नसावी. या व्यतीरिक्त पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सेशन्स होतील. तसंच ४५ मिनिटांचे हे ऑनलाईन क्लासेस असतील. नववी ते बारावी साठी ३० ते ४५ मिनिटांचे क्लासेस असतील. मानवी संसाधन मंत्रालयाने गाईडलाईन्सद्वारे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा विचार करून नियम तयार केले आहेत.
डॉ. मोहसिन यांनी सांगितले की लोक आपापल्या घरात बंद असल्यामुळे इंटरनेटचा वापर जास्त करत आहेत. त्यामुळे अभ्यास करताना मुलांना इंटरनेट स्पीडच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे व्हिडीओ आणि ऑडिओचा दर्जा खराब होत आहे. परिणामी मुलांची एकाग्रता कमी होत आहे. त्यामुळे अभ्यासावरही परिणाम होऊ शकतो. ऑनलाईन क्लासेसमुळे मुलाच्या बसण्याची स्थीती बदलल्याने मानदुखी, पाठदुखी, सर्वाइकल पेन, लठ्ठपणा, वजन वाढणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय बोटांशी निगडीत समस्याही उद्भवू शकतात.
यासाठी आपली मुलं कशाप्रकारे बसतात. स्क्रीनचा आकार मोठा आहे की नाही. इंटरनेट स्पीड यांसारख्या लहान लहान गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. भविष्यकाळातील आव्हानांना यशस्वीरित्या सामोरं जाण्यासाठी ऑनलाईन क्लासेस दरम्यान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन क्लासेस दरम्यान पालकांनी फक्त मुलांच्या अभ्यासाकडेच नाही तर आरोग्याकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे.
फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी
धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण