ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी करा 'हे' उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 04:14 PM2019-12-04T16:14:55+5:302019-12-04T16:16:45+5:30
Breast Care Tips : जगभरातील महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तसेच भारतातही ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.
(image credit- Medscap)
जगभरातील महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तसेच भारतातही ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील स्त्रीया या संबंधी आजारांची तपासणी करण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे योग्य निदान न झाल्याने कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीत आहार घेण्याच्या पध्दतीत फार बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करायचा असेल. तर कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं
जर स्त्रीयांना स्तनात वेदना होत असतील. तसेच अचानक मुलायम होत असतील. तर दुर्लक्ष करू नका.
खाज येणे, वेदना जळजळ होत असेल तर हेही एक कर्करोगाचे लक्षण आहे. निप्पलमधून पांढरा द्रव निघणे : यामधून पांढरा द्रव किंवा इतर रंगाचा येणे किंवा रक्त येणे हे स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.
भूक न लागणे, स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवणे ही लक्षणं सुध्दा धोकादायक ठरतात.
ज्या महिलांचा मासिक पाळी बंद झाली असेल त्यांनी महिन्याच्या एका ठराविक तारखेला ब्रेस्ट एक्झॅमिनेशन करणे आवश्यक आहे. जर स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ, किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी या गोष्टीं करा
आहारात मिठाचं प्रमाण कमी करा. रोज ताजं आणि सकस अन्न खा. नियमित व्यायाम करा. व्यायामामध्ये नियमित योगासनं करा. कडक उन्हापासून स्वतःचा बचाव स्वतःच करा.
जास्त घाम येत असल्यास दिवसातून कमीतकमी दोन वेळा अंघोळ करा. घट्ट अंर्तवस्त्र घालू नका . जर जास्त घट्ट कपडे घातल्यास रक्त पुरवठा कमी होण्याची शक्यता असते.
मद्यप्राशन करणे हे स्तनांच्या कॅन्सरचे कारण ठरू शकतं.
साखरेचं अतीसेवन मधुमेह, लठ्ठपणा यांसारखे आजार उद्भवतात. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.