अंगाला सतत खाज येते? जाणून घ्या फंगल इन्फेक्शन कसं होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 10:29 AM2019-12-02T10:29:37+5:302019-12-02T10:34:59+5:30
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेक लहान मोठ्या तसेच त्वचेच्या विकारांचा सामना करावा लागतो.
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेक लहान मोठ्या तसेच त्वचेच्या विकारांचा सामना करावा लागतो. बदलत्या वातावरणामुळे घाम येतो. आणि त्वचेला खाज येणे. त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येणे. अशा समस्या उद्भवतात. त्याचे रुपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होते. गजकर्ण हे एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे. सर्वसाधारपणे हे जांघ, पायांच्या बोटांमध्ये होते. उष्णता, घाम, ओलेपणा याचा परीणाम थेट आरोग्यावर होत असतो. चला तर मग जाणून घेऊया याची लक्षणं आणि उपाय.
या प्रकारचे ईन्फेक्शन झालयानंतर त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी पुरेशी जागा नसते. यामुळे कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. किंवा अंग ओलं असताना कपडे घातले जातात. यामुळे त्वचेच्या काही भागांवर खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात.
फंगल इन्फेक्शनची लक्षणं
त्वचेला खाज येणे.
त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येणे.
त्वचेतून पांढऱ्या रंगाचा पदार्थ निघणे. भेगा पडणे. फटी पडणे.
सतत केस गळणे.
नखं पिवळी किंवा काळे पडणे.
फंगल ईन्फेक्शनपासून वाचण्यासाठी उपाय
घट्ट कपडे घालू नका.
ओले मोजे घालू नका दररोज कपडे आणि यांना उन्हात वाळवा.
नेहमी सैल आणि सुती कपडे घालणे चांगले आहे.
वेळच्यावेळी नखं कापा.
दुसऱ्यांचे कपडे घालू नका.
दुसऱ्यांचे कपडे, कंगवा, टॉवेल वापरू नका. याचा उपचार मध्येच सोडू नका. नाहीतर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
शक्यतो ऑफीसला जाणाऱ्या स्त्रीयांनी वेस्टन पध्दतीच्या शौचालयाचा वापर टाळावा. कारण त्या शौचालयात अवयवांशी थेट संपर्क येत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे.