काय आहे हदयरोगापासून दूर राहण्याचा सोपा उपाय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:08 AM2019-12-23T10:08:23+5:302019-12-23T10:34:28+5:30

भारतात हृदय रोगाच्या आजाराने मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या सर्वाधीक आहे.

How to prevent from heart disease | काय आहे हदयरोगापासून दूर राहण्याचा सोपा उपाय? 

काय आहे हदयरोगापासून दूर राहण्याचा सोपा उपाय? 

googlenewsNext

भारतात हृदय रोगाच्या आजाराने मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या सर्वाधीक आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आजारांबद्दल उशीरा माहिती मिळणे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना हृदयाशी संबंधीत समस्या असतात. त्यांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची  समस्या असते. अशा लोकांनी वेळेवर रेग्यूलर मेडीकल चेकअप केल्यास होत असलेल्या किंवा होणाऱ्या आजारांपासून वाचता येऊ शकतं. 

धूम्रपान करणे, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल , शारिरीक श्रमाची कमतरता. आनुवंशिकता ताण-तणाव, रागीटपणा या समस्यांमुळे हदयरोग होण्याचा धोका जास्त असतो. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. भारतासहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. 

हार्ट अटॅकने मृत्यू होत असलेले ५० टक्के लोक असे असतात की त्यांना आपल्या आजाराबद्दल माहित नसतं. त्यात काही रुग्ण असे असतात जे डॉक्टरने दिलेल्या औषधांचे सेवन करत नाही. बदलत्या वातावरणात जर आपण जीवन जगण्याच्या पध्दतीत बदल केला तर नक्कीच  आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकता. 

हदयाशी संबंधीत आजार हे लवकर बरे होणारे नसतात. जगभरात हदय रोगाचे सुमारे २.६ करोड रुग्ण आहेत. तसंच भारतात ८० लाख ते १ करोड या संख्येत आहेत. अनेक माध्यमसमुहांकडून या आजारांपासून लोकांना वाचवण्यासाठी जागृती निर्माण केली जात आहे. रिसर्च रिर्पोटनुसार ६० टक्के लोकांचे हदयाशी संबंधीत आजारांचे उपचार नीट केले जात जात नाही. तसंच चुकीच्या पध्दतीने सुद्धा उपचार केले जातात. त्यामुळे हदयाशी संबंधीत आजारांचा धोका वाढत आहे. 

Web Title: How to prevent from heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.