कोरोनापेक्षाही जास्त त्रासदायक असतं फुप्फुसाचं फंगल इन्फेक्शन, जाणून घ्या बचावाचे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:04 PM2020-03-24T12:04:48+5:302020-03-24T12:10:55+5:30
फंगल इन्फेक्शन हवा, पाणी आणि श्वासांमार्फत शरीरात प्रवेश करून फुप्फुसानां नुकसान पोहोचवू शकतं.
दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक आजारांकडे दुर्लक्ष करत असतो. ज्यामुळे मोठी किंमत मोजावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला फुप्पुसांच्या फंगल इन्फेक्शनबद्दल सांगणार आहोत. फंगल इन्फेक्शन कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आपलं शिकार बनवत असतं. फंगल इन्फेक्शन हवा, पाणी आणि श्वासांमार्फत शरीरात प्रवेश करून फुप्फुसांना नुकसान पोहोचवू शकतं. त्यामुळे संपूर्ण शरीराचं कार्य बिघडू शकतं. तसंच रक्तभिसारण व्यवस्थित न झाल्यामुळे शरीराचं नुकसान होतं.
जर फुप्फुसांचं फंगलं इन्फेक्शन झालं असेल तर त्यांच्या लक्षणांना समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. फुप्फुसांमध्ये फंगल इन्फेक्शन झाल्यास खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होणं ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे थकवा जाणवत असतो. या लक्षणांना ओळखण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असते. कारण सामान्य लक्षणांमुळे हा आजार लोकांना ओळखता येत नाही.
काय आहेत लक्षणं
खोकला
सर्दी
श्वास घेण्यास त्रास होणं
ताप
डोकंदुखी
झोपताना घाम घेणं
थकवा येणं.
उपाय
या आजाारावर वैद्यकीय उपाय आहेत. फंगल इन्फेक्शनच्या आजारावर डॉक्टरांकडून एंटी अस्थमाचे औषध दिले जाते. त्यामुळे श्वास घेण्याची प्रकिया व्यवस्थित होत असते. त्यामुळे फुप्फुसांमधील इन्फेक्शन कमी होते. शरीरातील ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालेले असते. त्या ठिकाणी ही औषधं इफेक्टिव्ह ठरत असतात. गंभीर परिस्थितीत फुप्फुसांमध्ये असलेले इन्फेक्शन रोखण्यासाठी एंटी फंगस गोळ्यांचे सेवन करणं रुग्णासाठी फायद्याचं ठरत असतं. या स्थितीत आ़हारासंबंधी पथ्य पाळणं गरजेचं आहे. मादक पदार्थांचे अतिसेवन करू नये हा यावर उपाय आहे. तसंच थंड पाण्याचे किंवा आहारातील थंड पदार्थांचे सेवन कमी करणं फायद्याचं ठरेल. ( हे पण वाचा- Coronavirus : कोरोनाच्या 'या' गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास असू शकतो जीवाला धोका, रिसर्चमधून खुलासा)