प्रायव्हेट पार्ट्सला होणारे इन्फेक्शन 'या' उपायांनी करा दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 11:41 AM2019-12-06T11:41:42+5:302019-12-06T15:17:26+5:30
शरीराच्या प्रायव्हेट पार्टसवर नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे इन्फेक्शन होत असतं.
शरीराच्या प्रायव्हेट पार्टसवर नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे इन्फेक्शन होत असतं. कारण रोजच्या व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकाला स्वतःच्या शरीराकडे फारस लक्ष द्यायला मिळत नाही. त्याचा नकारात्मक परीणाम आरोग्यावर होत असतो. बदलत्या वातावरणात घाम येण्याचे प्रमाण वाढतं. काख, मांड्या यांमध्ये खाज येऊन वेगवेगळ्या त्वचेशी निगडीत आजारांची लागण होते. आणि अशा प्रकारच्या आजारांजा धोका असा की यामध्ये ईन्फेक्शन झालेल्या भागानंतर संपुर्ण शरीरात ते इन्फेक्शन पसरतं. त्वचेच्या खाजेची समस्या अनेक कारणांनी उद्भवू शकते.
खाज जर वारंवार येत असेल तर ते वजायनल पेन किंवा लिव्हरचे दुखणेही असू शकते. स्किनची समस्या बहुतांश वेळा अलर्जी, स्किन रॅशेस आणि डर्माटायटिस म्हणजेच त्वचारोगामुळे उद्भवते. ही समस्या संपूर्ण शरीराला किंवा शरीराच्या विशिष्ट अवयवालाही असू शकते. शरीराला झालेल्या अन्य आजारांमुळे त्वचा रुक्ष होऊन खाजेची समस्या सुरू होते. फोड आणि पुरळ येऊन खाज सुरू होते.
(Image credit- her world)
लघवी केल्यानंतर ती जागा पाण्याने स्वच्छ न केल्यास इन्फेक्शन होऊन खाज येते. स्त्री-पुरुषांच्या डोक्यात उवा झाल्यानेही खाज होते. जीने चढताना किंवा रस्त्यावरून चालताना तापमान अधिक असेल तरी खाज सुरू होते. सुरुवातीला खाजेचे प्रमाण कमी असते. जोराने खाजवल्याने त्वचा लाल होते. त्वचेवर पुरळ उठते. कंबर, छाती, मांड्या आणि बेंबीच्या आसपास खाजेची समस्या उद्भवते. तसेच बर्थ कंट्रोलसाठी वापरली जाणारी उत्पादनं ही त्या भागावर इन्फेक्शन होण्याची कारणं ठरु शकतात. अनेकदा शरीर संबंधांदरम्यान योग्य ती काळजी न घेतल्याने आजारांचा धोका वाढतो.
त्वचेवरील खाजेपासून वाचण्यासाठी काही खास टीप्स
त्वचा मऊ राखण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा.
अँटी इचिंग क्रीमचा वापर करावा.
कडुलिंबाची पाने उकळून गाळून त्याने अंघोळ केल्यास खाज कमी होते.
वाढलेल्या नखांनी इन्फेक्शन झालेल्या भागांना खाजवू नका.
सकाळ-संध्याकाळी नियमीत अंघोळ करा.
डॉक्टरांच्या सल्ल्याने अलर्जी रोखणारे औषध घ्यावे.
साबण, डिटर्जंट परफ्यूम डॉक्टरांच्या सल्ला घेऊन वापरा.
चिंच, लोणचे, लिंबू, टोमॅटो, तेल, लाल मिरची, चहा यांसारख्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे..