या पाच गोष्टींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका होतो कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 08:28 PM2019-11-29T20:28:36+5:302019-11-30T16:35:33+5:30

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहेत.

How to Preventing the Diseases using home remedies | या पाच गोष्टींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका होतो कमी

या पाच गोष्टींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका होतो कमी

Next

(Image credit-Healthhavard.edu)

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनियमीतता या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देत आहेत. अश्यात आपल्या आरोग्याचा बचाव करण्यासाठी  तसेच स्वतःला आजारमुक्त ठेवण्यासाठी काही घरगुती घटक उपयोगी ठरतात.

हिवाळ्यात डासांमुळे डेंग्यू मलेरीया सारखे आजार वाढत आहेत. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या भोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूची खास लक्षणं साध्या डेंग्यूमध्ये काही रुग्णांमध्ये दिसतात, पण अनेकदा साधा डेंग्यू व इतर विषाणू-ताप यांच्या लक्षणांमध्ये फरक नसतो. काही घरगुती उपायांनी ताप, डेंग्यु यांसारख्या आजारांचा सामना करु शकतो.

पपई


पपई शरीरातील पेशी वाढववण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते. आणि आपली पचन शक्ती वाढवण्यास मदत होते. याच्यात डाईट्रि फायबर उपलब्ध असतात. ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. पपई खाल्याने आपल्या शरीराला विटामिन c मिळतं. ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवून अनेक आजारांपासून वाचवते.


डाळिंब-

ताप आल्यानंतर जर डाळिंबाचा रस दिला. तर शरीरातील उष्णता कमी होते. आणि ताप उतरतो. तसेच अनेकजणाचं पोट साफ होत नाही, गॅसेस होतात अशावेळी डाळींब खाणं फायदेशीर ठरतं. 


दुधी-

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने शरीरासाठी गुणकारी ठरते. तसेच दुधीच्या रसात ९८ टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच दुधी ही हृद्याशी निगडीत समस्यांपासुन बचाव करते.


बीट-


बीटाचा वापर इतर अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी केला जातो. ज्यात ताप, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाब (BP) देखील नियंत्रित ठेवते. बीट सक्रियपणे दृष्टि सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांमधील फॉलीक असिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी कार्य करते. म्हणूनच डॉक्टर आपल्या दैनंदिन आहारात बीट समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.


पाणी-


सर्दी असल्यास कोमट पाणी पिणं हा  चांगला  उपाय ठरतो. कोमट पाणी पिल्यानं घसाही बरा राहतो. घशात होणारं कुठलंही इन्फेक्शन यामुळे होत नाही. कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील सर्व प्रकारची अशुद्धता बाहेर पडते. पाण्यामुळे शरीराचं तापमान वाढून घाम येतो. त्या माध्यमातून शरीरातील सर्व अशुद्धता दूर होते. आणि शरीर आजारांपासुन मुक्त राहते.

Web Title: How to Preventing the Diseases using home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.