ऑपरेशन करून नाही तर घरच्याघरी 'या' उपायांनी किडनी स्टोनपासून मिळवा सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:00 AM2020-01-13T10:00:42+5:302020-01-13T10:08:13+5:30
मानवाच्या शरीरातील किडनी खूप महत्वाचा अवयव आहे.
मानवाच्या शरीरातील किडनी खूप महत्वाचा अवयव आहे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे वेगवेगळे आजार उद्भवत असतात. किडनी स्टोन सुध्दा त्या आजारांपैकीच एक आहे. अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकिच्या सवयींमुळे शरीराचं खूप नुकसान होत असतं. अनेकदा किडनी स्टोन झाल्यानंतर ऑपरेशन सुद्धा करावं लागत असतं. या आजारात पोटात होत असलेल्या वेदना असह्य होत असतात.
पण तुम्हाला माहीत आहे का काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही किडनी स्टोनपासून सुटका मिळवू शकता. घरगुती वापरातील काही गोष्टींचा वापर करून तुम्ही किडनी स्टोनच्या समस्येला दूर ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया घरच्याघरी उपाय करून कसा करायचा आजारांपासून बचाव.
जास्तीत जास्त पाणी पिणे
माणसाच्या शरीरात ७० टक्के पाणी आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचू शकते. प्रत्येक व्यक्तीने कमीतकम दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे. जर तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायलात तुम्हाला स्टोन होण्याची समस्या उद्भवणार नाही. तसंच समस्या उद्भवल्यास जर तुम्हाला झालेल्या स्टोनचा आकार लहान असल्यास तो मुत्रावाटे निघून जाईल.
राईचं तेल आणि लिंबाचा रस
जर तुम्हाला किडनी स्टोन झाला असेल आणि तुम्हाला कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय तो स्टोन काढायचा असेल तर राईचे तेल आणि लिंबाच्या रसासारखा दुसरा कोणताही उपाय नाही. लिंबाच्या रसात राईचं तेल मिक्स करून ते प्यायल्यास समस्या नष्ट होते. कारण त्यातील लिंबाचा रस स्टोन तोडण्यासाठी आणि राईचं तेल स्टोनला बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरतं.
सफरचंदाचं व्हिनेगर
सफरचंदामध्ये सिट्रिक एसिड असतं. जे किडनीत तयार झालेल्य स्टोनला तोडण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. किडनी स्टोन हा पुर्णपणे नष्ट होऊ शकतो. व्हिनेगर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी उपयोगी असतं पण त्याचे सेवन करण्याचे प्रमाण माहित असणं गरजेचं असतं. सकाळच्यावेळी दोन लहान टिस्पून गरम पाण्यासोबत घेऊ शकता.
डाळिंबाचे सेवन
एन्टीऑक्सिड्ंस डाळिंबात मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आजारांपासून बजाव होतो. तंसच नैसर्गीकरित्या तुमचे आजार बरे करण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी डाळींब फायजदेशीर ठरतं असत. त्याचसोबत आवळ्याच्या सेवनाचा सुद्धा शरीराला फायदा होत असतो. त्यासाठी दररोज सकाळी एक चमचा आवळा पावडर खा. असे केल्यास किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळेल.