व्हायरल, बॅक्टेरिअल इन्फेक्शन टाळण्यासाठी जालिम उपाय काळा चहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:51 PM2020-03-11T16:51:42+5:302020-03-11T17:06:16+5:30

काळ्या चहाचा आहारात समावेश केला तर रोगप्रतिकारकशक्ती वाढून  कोरोना व्हायसरपासून बचाव करता येऊ शकतो.

How to protect from corona virus by drinking black tea myb | व्हायरल, बॅक्टेरिअल इन्फेक्शन टाळण्यासाठी जालिम उपाय काळा चहा!

व्हायरल, बॅक्टेरिअल इन्फेक्शन टाळण्यासाठी जालिम उपाय काळा चहा!

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा धोका सध्या सगळीकडे वाढत चालला आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या  वाढत जात आहे. अशाच खबरदारीचे उपाय म्हणून आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी याबाबत  विविध माध्यामातून माहिती दिली जात आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकराच्या व्हायरल इन्फेक्शन पासून स्वतःचा बचाव  करू शकता, दुधाचा चहा पिण्यापेक्षा जर तुम्ही काळ्या चहाचा आहारात समावेश केला तर रोगप्रतिकारकशक्ती वाढून  कोरोना व्हायसरपासून बचाव करता येऊ शकतो.

तुम्ही योग्य पद्धतीने काळा चहा पित असाल तर इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी  हे ड्रिंक बेस्ट आहे. काळा चहा तुम्हाला डायरिया, हिपॅटाईटीसपासून वाचवू शकतो. याव्यतिरिक्त अनेक  घटक असतात. ते रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतात.

तज्ञांच्यामते तुम्ही जर काळ्या चहाचे सेवन करत असाल तर चांगली झोप लागते, भूक चांगली लागते. त्याचप्रमाणे  व्हायरस आणि बॅक्टेरीया कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. ब्लॅक टी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बरेचसे पोटाचे विकार कमी होऊ शकतात. आपल्या शरीराची इम्यून सिस्टीम आपला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करते. यावरून हे स्पष्ट होतं की, इम्यून शक्ती कमजोर झाली तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. अशात फार गरजेचं असतं की, सतत रोगप्रतिकारक शक्ती मजूबत ठेवणे.

 काळ्या चहामुळे अतिसार आणि उलट्या होण्यालासुद्धा यामुळे अटकाव होतो. तसंच कमी प्रमाणात काळा चहा प्यायल्याने मुतखड्यापासून बचाव होऊ शकतो. काळया चहामुळे तरतरी आणि उत्साह वाढतो आणि त्यामुळे कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. याशिवाय काळा चहा चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होऊन चेहऱ्यावरील काळे डागही नाहिसे होतात. (हे पण वाचा-Coronavirus : दुबईहून आलेली कल्याणची महिला वैद्यकीय निरिक्षणाखाली)

 


काळा चहा कधी आणि किती प्यायचा  

तुम्ही दिवसभरात ४ तासाच्या अंतरावर तुम्ही पिऊ शकता. उच्च रक्तादाबाच्या रुग्णांनी काळ्या चहाचं सेवन करणं गरजेचं आहे. डायबिटीसच्या  रुग्णांची रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात  राहण्यासाठी काळ्या चहाचं सेवन फायदेशीर ठरत असतं.  याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी या चहाचे सेवन फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे पचनक्रिया सुद्धा व्यवस्थित राहत असते.  ( हे पण वाचा- किडनीविकार रोखण्यासाठी असंघटीत कामगार क्षेत्रात बेल फॉर वॉटर उपक्रम राबविणे गरजेचे - अमित जैन )

Web Title: How to protect from corona virus by drinking black tea myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.