घरी जाताना सोबत येऊ शकतो कोरोना, संसर्ग टाळण्यासाठी प्रवासादरम्यान 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:46 PM2020-05-13T18:46:37+5:302020-05-13T18:49:38+5:30
घराबाहेर पडल्यानंतर तुम्ही स्वतःच्या आरोग्याबाबत लहान सहान गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
(image credit- The daily star)
लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपापल्या घरी किंवा गावी जायची ओढ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही संबंधित प्रशासकीय यंत्रणेला अर्ज करून आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकता. घराबाहेर पडल्यानंतर तुम्ही स्वतःच्या आरोग्याबाबत लहान सहान गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे सुरू करण्याच आल्या आहेत. पण सध्याच्या काळात प्रवास करणं जोखमीचं ठरू शकतं. त्यामुळे जर तुम्ही कुठेही जात असाल तर काळजी घेणं गरजेंच आहे.
बाहेरचे पदार्थ खाणं टाळा
बाहेरील खाद्यपदार्थ खाणं शक्यतो टाळा. एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीचा त्याला स्पर्श झालेला असू शकतो. प्रवासादरम्यान किंवा प्रवासानंतरही कुठेही सार्वजनीक ठिकाणी खाणं टाळा.
देवाण- घेवाण टाळा
प्रवासात सहप्रवाशांकडून कोणतीही वस्तू घेऊ नका, कारण वस्तूंमार्फतही कोरोनाव्हायरस पसरू शकतो. त्यामुळे लहान सहान गोष्टी इतरांच्या घालून घेऊ नका. जर एकाद्या वस्तूला हात लावावा लागला तर लगेच सॅनिटाईज करून घ्या.आपल्या सामानाला स्पर्श करण्यापूर्वी सॅनिटाइज करून घ्या. ते शक्य नसल्यास सामानाला हात लावल्यानंतर हात स्वच्छ करा.(आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या)
मास्क, ग्लोव्हज घाला
प्रवासात मोबाइलचा कमीत कमी वापर करा, मोबाइलवरही कोरोनाव्हायरस असू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क जरूर लावा. कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये लक्षणं दिसत नसतील, तर असा व्यक्ती इतरांना संक्रमित करू शकतो, शक्यतो हातात ग्लोव्ह्ज घाला. संपूर्ण शरीर झाकलेलं असू द्या. त्यानंतर प्रवासादरम्यान वापरलेले कपडे, रुमाल, बॅग, पिशव्या या वस्तू धुवून टाका.(फ्फुसांच्या आजारांचं कारण ठरू शकतं चेस्ट इन्फेक्शन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)