नवीन वर्षात 'हा' संकल्प कराल तर अंगावरची वाढलेली चरबी नक्की होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 10:23 AM2019-12-25T10:23:39+5:302019-12-25T12:45:14+5:30

नाताळ  तसंच नवीन वर्षाच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्याच निमित्ताने तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाता. अशात काही पदार्थ खाण्यात येतात त्यामुळे तुमचं वजन सुध्दा वाढू शकतं.

How to reduce belly fat by using home remedies | नवीन वर्षात 'हा' संकल्प कराल तर अंगावरची वाढलेली चरबी नक्की होईल कमी

नवीन वर्षात 'हा' संकल्प कराल तर अंगावरची वाढलेली चरबी नक्की होईल कमी

Next

नाताळ  तसंच नवीन वर्षाच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्याच निमित्ताने तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाता. अशात काही पदार्थ खाण्यात येतात त्यामुळे तुमचं वजन सुध्दा वाढू शकतं. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वेगळी मेहनत घ्यावी लागते. पण स्वतःलाच असं वाटत राहत की आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे होते. कारण सुट्ट्या संपल्यानंतर रोजच्या आयुष्यात जगत असताना आपण इतकं व्यस्त होऊन जातो. की आपल्याला व्यायाम करायला आणि वजन कमी करण्यासाठी वेगळी मेहनत घ्यायला वेळ मिळत नाही. 

खासकरून पोटाची चरबी जर वाढली कर सहजासहजी कमी होत नाही. तुम्ही सुद्धा अशाच परिस्थीतीचा सामना करत असाल तर या येणाऱ्या नविन वर्षात तुम्ही काही संकल्प मनात ठरवून वजन कमी करण्याची प्रयत्न करू शकता. चला तर मग जाणून घेऊया वाढलेलं वजन नवीन वर्षात कसं कमी करायचं. 

भरपूर पाणी प्या 

जर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल तर किमान 7 ते 8 ग्लास पाणी दररोज पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील वाईट घटक बाहेर निघून जातात आणि पचनशक्ती सुधारते. तसंच जास्तीत जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट्स निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे नवीन वर्षात जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावून घ्या. 

 मिठाचं सेवन कमी करा. 

आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो. त्यासाठी त्रिफळा खा आणि वजन कमी करा. तसंच जेवत असताना जेवणात मीठ कमी असल्यास वरून मीठ घेणं टाळा. जेणकरून हे संपूर्ण वर्ष तुम्हाला आजारपणाचा किंवा लठ्ठपणाचा त्रास उद्भवणार नाही.

ग्रीन टी  चे सेवन

दिवसभरातून किमान एक कप ग्रीन टी घेतल्यास त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाखालची चरबी कमी व्हायला मदत होते. ग्रीन टी मुळे शरीरातील टॉक्जीन्स निघून जातात. तसंच शरीराला उर्जा मिळते. ग्रीन टी च्या एका कपमध्ये केवळ दोन कॅलरीज असतात. त्यामुळे आपण नेहमी घेत असलेल्या चहा किंवा कॉफीच्या ऐवजी ग्रीन टी चा समावेश आपल्या आहारामध्ये करणे फायद्याचे ठरू शकते.

लिंबाचं सेवन 

पोटाचा घेर कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. दररोज सकाळी लिंबूपाणी प्या. यामुळे चरबी कमी होईल. यातले पाणी कोमट असेल तर जास्त चांगले ठरेल . तसंच कच्च्या लसणामुळेही पोटाखालची चरबी कमी होऊ शकते. यामुळे पोटाचा घेर कमी होईलच, पण त्याबरोबरच रक्तप्रवाहही चांगला वाहू लागेल.

खाण्यापिण्याच्या वेळा चुकवू नका 

 येत्या नविन वर्षात किमान वेळेवर आहार घेण्याचा संकल्प करा. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये असलेली अनियमीतता तसंच  झोपेची कमतरता हे लठ्ठपणा वाढण्याचे सगळयात मोठे कारण आहे. त्यामुळे आहारात  सुखा मेवा, काकडी, गाजर, दूध, पनीर आणि अंडी यांचा समावेश करा. 

व्यवस्थीत झोप घ्या 

पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोपण्यापूर्वी गरम पाण्यानं आंघोळ करावी. त्यामुळं चांगली झोप लागते. झोप चांगली झाली तर पचनक्रिया चांगली राहते. अतिरिक्त फॅट बर्न होतं. झोपल्यानं शरीरातील हार्मोन कंट्रोल असतात, त्यामुळं सतत भूक लागत नाही आणि शरीरातील उर्जाही कमी होत नाही. जर तुम्ही पूर्ण झोप घेतली नाही तर वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. 

Web Title: How to reduce belly fat by using home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.