कोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन? समजून घ्या 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:25 PM2020-05-29T12:25:58+5:302020-05-29T12:37:14+5:30

लस तयार झाल्यानंतर त्याचे उत्पादन आणि वितरण सुरू करण्याचा प्लॅन सुद्धा तयार आहे.

How is the research on corona vaccine started in India know these 10 things myb | कोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन? समजून घ्या 'या' गोष्टी

कोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन? समजून घ्या 'या' गोष्टी

Next

संपूर्ण जगात हाहाकार पसरवलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लस हेच मोठं शस्त्र आहे.  भारतात कोरोनाची लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांकडूकन प्रयत्न केले जात आहेत. लस तयार झाल्यानंतर त्याचे उत्पादन आणि वितरण सुरू करण्याचा प्लॅन सुद्धा तयार आहे. या व्यतिरिक्त काही औषधांवर रिसर्च सुरू करण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला भारतात लसीची प्रकिया कशी सुरू आहे. याबाबत सांगणार आहोत.

 

मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ प्रकारच्या लसीचे कँडिडेट्स आहेत. देशातील ३० ग्रुप असे आहेत जे कोरोनाच्या लसीचा शोध घेत आहेत. सध्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या लसींवर प्रयत्न सुरू आहेत. mRNA लस, अटेनुएटेड, एनऐक्टिवेटेड आणि एडजुवेंट चा समावेश आहे.

भारतात ज्या लसींवर प्रयोग सुरू आहे. त्यातील काही प्री- क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सांगितले की,  लस तयार करण्यासाठी वेळ लागू शकतो. सध्याच्या काळात फिजिकल डिस्टेंसिंग आणि स्वच्छतेशिवाय कोणतेही पर्याय नाही.  मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी तसंच वितरण करण्यासाठी २ ते ३ बिलियन डॉलरचा खर्च येऊ शकतो. तसंच लस तयार करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागतो पण जगभरातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नाने वर्षभरात लस तयार होऊ शकते. यासाठी गुंतवणूक वाढवण्यात आली आहे. 

लसी व्यतिरिक्त कोरोना व्हायरससाठी प्रभावशाली औषधं शोधण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.  १० औषधांचा कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापर केला जात आहे. सगळी औषधं चाचणीच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहेत. भारतात  favipiravir, itolizumab, phytopharmaceutical (प्‍लांट बेस्‍ड), microbacterium W, convalescent plasma, arbidol, ACQH, HCQ, remdesivir या व्यतिरिक्त आणि BCG लसीची चाचणी सुरू आहे.  लस तयार करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवायला हवा. तसंच निर्मीती प्रक्रिया आणि वितरण प्रणाली सुरळीत असायला हवी, असे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी सांगितले.

CoronaVirus :चीनमध्ये दुसऱ्यांदा कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार; लक्षणांमध्ये होत आहेत 'हे' बदल

कोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल

Web Title: How is the research on corona vaccine started in India know these 10 things myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.