वजन कमी करण्यासाठी स्पार्कलिंग वॉटर किती सुरक्षित? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 12:24 PM2020-04-11T12:24:02+5:302020-04-11T12:24:32+5:30

स्पार्कलिंग वॉटरमध्ये काही मिनरल्स डिजोल्व केले जातात. जसे की, पोटॅशिअम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडिअम सायट्रेट इत्यादी.

How safe is sparkling water for weight loss? api | वजन कमी करण्यासाठी स्पार्कलिंग वॉटर किती सुरक्षित? जाणून घ्या...

वजन कमी करण्यासाठी स्पार्कलिंग वॉटर किती सुरक्षित? जाणून घ्या...

googlenewsNext

स्पार्कलिंग म्हणजे कार्बोनेटेड वॉटर (Sparkling or carbonated water) ज्याला सामान्य भाषेत बुडबुड्यांचं पाणी म्हणतात. हे एकप्रकारचं पाणी असतं ज्यात कार्बन डायऑक्साइड मिश्रित केलं जातं. गॅस पाण्यात दबावाने इंजेक्ट केला जातो, ज्यामुळे पाण्यात बुडबुडे तयार होता. कार्बोनेटडे पाण्याची काही सामान्य उदाहरणे आहेत क्लब सोडा आणि व्यावसायिक रूपाने स्पार्कलिंग वॉटरचं उत्पादन केलं जातं. 

स्पार्कलिंग वॉटरमध्ये काही मिनरल्स डिजोल्व केले जातात. जसे की, पोटॅशिअम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडिअम सायट्रेट इत्यादी. या मिनरल्सना शुद्ध रूपात बदलण्यासाठी पाण्यात कुत्रिम रूपात इंजेक्ट केलं जातं. अनेकजण आता सोड्याऐवजी स्पार्कलिंग पाण्याचं सेवन करत आहेत. कारण सोडा आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही.

काही लोक वजन कमी करण्यासाठी स्पार्कलिंग वॉटरचं सेवन करणं सुरू करतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, हे पाणी पिणं सेफ असतं की नाही. तसेच यावरही वाद सुरू असतो की, स्पार्कलिंग वॉटर पिणाऱ्यांनी साधं पाणी पिणे बंद केले पाहिजे का? साधं पाणी पिणं बंद करणं सेफ असेल का किंवा एखादी व्यक्ती केवळ कार्बोनेटेड पाण्यावर अवलंबून राहू शकते का?

महत्वाची बाब ही आहे की, काय स्पार्कलिंग वॉटर तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे/? काही आरोग्य तज्ज्ञांचं असं मत आहे की, हे साधं पाणी पिण्यासारखंच आहे. त्यामुळे स्पार्कलिंग वॉटर पिण्याचा वेगळा काही फायदा नाही. पण काही लोक दावा करतात की, याने वजन कमी करण्यास मदत होते. पण डॉक्टरांनी हे नाकारलं आहे. याचे काही फायदेही सांगितले जातात. जे खालीलप्रमाणे आहेत.

शुगर आणि कॅलरी फ्री

जर तुम्ही फ्लेवर्ड नसलेलं स्पार्कलिंग वॉटर पित असाल तर साधं पाणी पिण्यात आणि अनफ्लेवर्ड पाण्यात काहीच अंतर नाही. यात अतिरिक्त कार्बन डायऑक्साइडसोबतच कोणत्याही प्रकारची शुगर किंवा कॅलरी नसते.

दातांचं नुकसान होत नाही

यावर आता वाद सुरू झाला आहे की, काय स्पार्कलिंग वॉटर आपल्या दतांना किंवा इनॅमलला नुकसान पोहोचवतं की नाही. पीएच लेव्हलवर 7 पेक्षा खाली कोणत्याही प्रकारचं अम्लीय आहे आणि त्यामुळे याने दातांचं काहीही नुकसान होत नाही. 

स्पार्कलिंग वॉटर, साधं पाणीच

स्पार्कलिंग वॉटरसारखंच समान रूपाने हायड्रेटिंग असतं. पण सामान्य पाण्याच्या तुलनेत यातील पाणी सेवन करणं जरा कठिण असतं. त्यामुळे वजन कमी करण्यासासाठी लोक हे पाणी पितात. पण साधं पाणी पिणे बंद केल्यास समस्या होऊ शकते.
 

Web Title: How safe is sparkling water for weight loss? api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.