रोज ७ तास झोप पूर्ण करू शकत नसाल तर काय कराल? जाणून घ्या एक सोपा उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 01:08 PM2024-09-25T13:08:12+5:302024-09-25T13:09:08+5:30
Sleeping during weekends :आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे आणि वाढलेल्या कामाच्या ताणामुळे लोक पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत.
Sleeping during weekends : हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी आणि नेहमीच हेल्दी राहण्यासाठी रोज किमान ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे. अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनही असाच सल्ला देते की, आपण कमीत कमी ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे आणि वाढलेल्या कामाच्या ताणामुळे लोक पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत.
अशात जर तुम्ही वीकेंडला तुची झोप पूर्ण करत असाल तर याने तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवता येतं आणि हृदयरोगाचा धोका २० टक्के कमी केला जाऊ शकतो. याबाबत यूरोपिअन सोसायटी ऑफि कार्डिओलॉजीच्या एका रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे.
काय सांगतो नवा रिसर्च?
चीनच्या नॅशनल सेंटर फॉर कार्डियोवस्कुलरचे यानजुन सॉन्ग यांनी नुकताच एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, वीकेंडला जास्त झोपल्याने हृदयरोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो. 91000 लोकांवर गेल्या १४ वर्षांपासून एक रिसर्च केला जात आहे. ज्यात चार ग्रुप बनवण्यात आले आहेत. हे अशा आधारावर बनवण्यात आले आहे की, रोज रात्री कोण जास्त झोपले आणि कोण कमी. यानंतर याचं कॅल्कुलेशन करण्यात आलं. तेव्हा असं आढळलं की, जे लोक वीकेंडला त्यांची आठवडाभर राहिलेली झोप पूर्ण करतात त्यांच्यात जवळपास २० टक्के हृदयरोगांचा धोका कमी आढळला.
वीकेंडला झोप पूर्ण करण्याचे फायदे
जर तुम्ही रोज ७ तासांची झोप घेत असाल किंवा तुमची पूर्ण न झालेली झोप वीकेंड दरम्यान पूर्ण करत असाल तर याने तुमच्या शरीरात एनर्जी लेव्हल कायम राहते आणि तुम्हाला फ्रेश वाटतं. इतकंच नाही तर चांगल्या झोपेने तुमची स्मरणशक्तीही वाढते आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमताही वाढते.
एक्सपर्ट्स असंही सांगतात की, चांगल्या झोपेमुळे ब्लड प्रेशर आणि वजन कंट्रोल करण्यास मदत मिळते. तसेच झोपेने आपलं इम्यून सिस्टमही मजबूत होतं. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्यास मदत मिळते. झोप पूर्ण झााल्यावर मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.