बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून काढण्यासाठी सगळ्यात सोपा आणि खास उपाय, एकदा करून बघाच; Heart Attack चा टळेल धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 11:33 AM2023-03-18T11:33:59+5:302023-03-18T11:46:50+5:30
How To Reduce Cholesterol Fast : रक्तात जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू लागतो. रक्तावाहिन्यांमध्ये एक चिकट पदार्थ जमा होतो ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही.
How To Reduce Cholesterol Fast : वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कांदा कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, कांद्याची पाल एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर असते. त्यासोबतच लठ्ठ लोकांमधील हृदयरोगांचा धोका कमी करण्यासही याचा फायदा होतो.
रक्तात जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू लागतो. रक्तावाहिन्यांमध्ये एक चिकट पदार्थ जमा होतो ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. याने ऑक्सिजन आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो.
जर वेळीच हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्याचे उपाय केले गेले नाही तर स्थिती फार गंभीर होऊ शकते. कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी कांद्याची पाल जास्त फायदेशीर ठरते आणि हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ही सगळ्यात चांगली पद्धत मानली जाते.
कोणता कांदा सगळ्यात फायदेशीर?
रिसर्चमधून समोर आलं आहे की, लाल कांदा हृदयासाठी फार फायदेशीर असतो. कोलेस्ट्रॉल असलेल्या रूग्णांसाठी हा कांदा फाय चांगला मानला गेलाय. हेल्दी भाज्यांचं सेवन केलं तर गुड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढतं आणि शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढून हृदय निरोगी ठेवता येतं.
कांद्याची पाल हाय कोलेस्ट्रॉल करेल दूर
लसूण, कांद्याची पाल आणि इतर कांद्याच्या वापराने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते. कांद्याच्या पालीमध्ये ऑर्गनो-सल्फर तत्व भरपूर असतं, जे रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी ओळखलं जातं. त्यासोबतच कांद्याच्या पालीमध्ये फ्लेवोनॉयड्स असतात जे गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. रिसर्चनुसार, पालीच्या कांद्यामधील फ्लेवोनॉयड क्वेरसेटिन बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.
डायबिटीस रूग्णांसाठी कांदा फायदेशीर असतो. यात एक लो ग्लायसेमिक इंडेक्स असतं जे शुगर लेव्हल एकदम वाढवत नाही. तसेच यात फार कमी कार्ब्सही असतात. कांदा हृदयासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्या नेहमीच्या आहारात याचा समावेश करा. याने पचनक्रियाही चांगली होते. कच्चा कांदा खाल तर अधिक फायदा होऊ शकतो.