कशी कराल आपल्या बाळाची 100 टक्के जेंटल केअर?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 03:21 PM2018-11-06T15:21:33+5:302018-11-12T18:36:54+5:30
प्रत्येक स्त्रीला 'आई' बनायची इच्छा असते. तिच्यासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाजूक जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते.
प्रत्येक स्त्रीला 'आई' बनायची इच्छा असते. तिच्यासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाजूक जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. यामध्ये तिला 'बेबी केअर प्रॉडक्ट्स्'ची सर्वाधिक मदत होते. पण नवजात बाळासाठी 'बेबी केअर प्रॉडक्ट्स' निवडताना या पाच गोष्टींची खात्रीपूर्वक काळजी घ्या.
1. प्रॉडक्ट्सची मान्यता, जागतिक-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानकं तपासा
बाळाची त्वचा खूप नाजूक असते, विशेषतः नवजात बाळ अत्यंत नाजूक असतात. यासाठी प्रॉडक्ट्स् विकत घेतांना सर्वप्रथम त्यांचे जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानकं तपासून घ्यावे. शिवाय, प्रॉडक्ट्सच्या चाचण्याबद्दल माहिती मिळवणे विसरू नका.
उदाहरणार्थ, जॉनसन्स बेबी केअर प्रॉडक्ट्स मधील प्रत्येक घटकाची (तत्त्व) तपासणी 12 महिन्यांपर्यंत केली जाते. जगभरातील जवळपास 5.5 लाख लोकांनी तपासणी केल्यानंतर आणि 8000 वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्यानंतरच त्यांचे प्रॉडक्ट्स बाजारात आणले जातात.
2. प्रॉडक्ट्स नवजात बाळावर वापरायला सुरक्षित आहेत का?
नवजात बाळाच्या शरीरातील स्नायू आणि त्वचा कालांतराने मजबूत होते. यामुळे जे प्रॉडक्ट्स तुम्ही विकत घ्यायचा विचार करत आहात, ते बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत ,याची खात्री करुन घ्या. काही प्रॉडक्ट्सवर हॉस्पिटल्स देखील विश्वास ठेवतात. जसे की जॉनसन्स टॉप-टू-टो/ top-to-toe™ वॉश जगभरातील विविध हॉस्पिटल्सची पहिली पसंत आहे. बाळाच्या जन्मानंतर त्याला/तिला या वॉशनेच आंघोळ घातली जाते.
3. प्रॉडक्ट्समुळे बाळाच्या त्वचेची जळजळ होता कामा नये
कुठलेही प्रॉडक्ट्स विकत घेतांना त्याच्या उपयोगाने बाळाच्या त्वचेची किंवा डोळ्यांची जळजळ होणार नाही किंवा त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्वचे इतकीच बाळाच्या डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जॉनसन्स नो मोर टीयर्स ™ [No More Tears ™]शॅम्पू लहान मुलांसाठी अगदी योग्य आहे कारण यामुळे त्यांच्या डोळ्यांची जळजळ होत नाही.
प्रॉडक्ट्स मध्ये कोणतेही रंग वापरल्या गेले नाही आहेत हे देखील तपासणे अत्यावश्यक आहे. मुलांना अॅलर्जी होईल, अशी कोणतीही वस्तू बेबी प्रॉडक्ट्समध्ये नसावी. जॉनसन्सचे सर्व प्रॉडक्ट्स हायपो-अॅलर्जेनिक [Hypoallergenic] असल्यामुळे मुलांना अॅलर्जी होण्याची भीती कमी असते.
4. बेबी केअर प्रॉडक्ट्समधील सुगंधाचीही चाचणी झालेली असावी
बेबी केअर प्रॉडक्ट्स मधील सुगंध मुलांकरिता आल्हाददायक ठरतो. शिवाय, यामुळे बाळाच्या विकासाच्या दृष्टीनेही प्रचंड मदत होते. पण प्रॉडक्ट्समधील सुगंध बाळाच्या आरोग्याकरिता सुरक्षित आहे किंवा नाही, याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. जॉनसन्समध्ये वापरण्यात आलेला सुगंध केवळ मनमोहकच नाही तर त्याला International Fragrance Association/ इंटरनॅशनल फ्रेगन्स असोसिएशन कडून मान्यता देखील देण्यात आली आहे.
5. प्रॉडक्ट्समध्ये आवश्यकच गोष्टी असाव्यात
आजची आई बेबी प्रॉडक्ट्स मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रिझरव्हेटिव्हज/परिरक्षकां बद्दल सांशक असते. पण नवीन जॉनसन्स प्रॉडक्ट्स मध्ये पॅराबेन, सल्फेट किंवा थॅलेटचे अंश नसतात. म्हणूनच आजची आई आपल्या बाळासाठी निर्धास्तपणे जॉनसन्स प्रॉडक्ट्स ची निवड करू शकते. आणि अशा प्रकारे योग्य प्रॉडक्ट्सची निवड करुन तुम्ही आपल्या बाळाला पहिल्या दिवसापासून देऊ शकता 100 टक्के जेंटल केअर