कोरोनाच्या माहामारीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांपासून 'असा' करा बचाव; जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 06:29 PM2020-06-22T18:29:00+5:302020-06-22T18:34:37+5:30
पावसामुळे पुरेसा सुर्यप्रकाश नसल्याने हवेतील जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
(Image Credirt- Live chennai)
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेगवेगळे आजार मान वर काढायला सुरूवात करतात. कारण वातावरणात झालेल्या बदलांचा प्रकृतीवर परिणाम होत असतो. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणं अशा समस्या नेहमी उद्भवतात. पण यावर्षी कोरोनाची माहामारी असल्यामुळे सगळ्याच लोकांना आजारी पडण्याची जास्त भीती वाटत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या माहामारीत पावसाळ्यातील साथीच्या रोगांशी लढण्यासाठी उपाय सांगणार आहोत.
पावसामुळे पुरसा सुर्यप्रकाश नसल्याने जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून पावसात भिजणं टाळा, छत्री किंवा रेनकोट घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
झाडांच्या कुंडीत किंवा डब्यात पाणी साचू देऊ नका. कारण अशा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असते. डासांपासून बचाव करणारे जाळ्या, मच्छरदाणी, क्रीम यांचा वापर करावा. घरामध्येही फुलदाणी, फिशटॅंक यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवावी.
रोगप्रतिकाशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. गाजर, हळदीचे दूध, आलं , लसूण, आहारात समावेश करा. हळदीत अँटीऑक्सिडंट गुण आहेत. सर्दी आणि खोकल्यासाठी लसूण अतिशय गुणकारी आहे. श्वसनाची समस्या असणाऱ्यांसाठी आले खाणे अतिशय फायदेशीर आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा भरपूर पाणी प्या.
व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटामीन डी घ्या. बाहेर जाणं शक्य नसेल तर इमारतीच्या गच्चीवर किंवा गॅलरीतून सुर्यप्रकाश अंगावर घ्या. कारण सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनमुळे व्हिटामीन डी ची कमतरता लोकांच्या शरीरात निर्माण झाली आहे.
बाहेर पडत नसाल तरी घरच्याघरी २० ते ३० मिनिटं वेळ काढून व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. व्यायाम रोजे केल्याने तुमचं वजन वाढणार नाही. रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहिल. याशिवाय शरीर ताजेतवाने राहून शांत झोप येईल. जास्तीत जास्त गरम पाण्याचे सेवन करा. जेणेकरून घश्यासंबंधी तक्रारी उद्भवणार नाहीत. बाहेर जाताना मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंगचं पालन न चुकता करा.
भारतात तयार होत आहे कोविड19 चे औषध; जाणून घ्या डोस, किंमत याबाबत ८ महत्वाच्या गोष्टी
कानांमार्फतही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? माहीत करून घ्या संक्रमणाबाबत फॅक्ट्स