Ayushman Bharat : 'या' सरकारी योजनेतून 3.8 कोटी लोकांना मिळाले मोफत उपचार; कोणाला घेता येईल लाभ? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 05:40 PM2022-09-25T17:40:11+5:302022-09-25T17:41:15+5:30

Ayushman Bharat : या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.8 कोटी लोकांना मोफत उपचार मिळाले आहेत. सरकारने 2018 मध्ये ही योजना सुरू केली. 

how to check ayushman bharat yojana eligibility know all details here | Ayushman Bharat : 'या' सरकारी योजनेतून 3.8 कोटी लोकांना मिळाले मोफत उपचार; कोणाला घेता येईल लाभ? जाणून घ्या...

Ayushman Bharat : 'या' सरकारी योजनेतून 3.8 कोटी लोकांना मिळाले मोफत उपचार; कोणाला घेता येईल लाभ? जाणून घ्या...

Next

नवी दिल्ली : देशातील गरीब घटकांना मोफत उपचार देण्यासाठी सरकार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Ayushman Bharat Yojana) राबवत आहे. याअंतर्गत केंद्र सरकार लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्याची सुविधा देते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.8 कोटी लोकांना मोफत उपचार मिळाले आहेत. सरकारने 2018 मध्ये ही योजना सुरू केली. 

अलीकडेच, या योजनेला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, गेल्या चार वर्षांत देशातील सुमारे 4 कोटी लोकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचाराचा लाभ मिळाला आहे.

कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकते. आयुष्मान ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे, ज्या अंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते.

कोण करू शकतो अर्ज?
या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना रुग्णालयात जाऊन आपले उपचार मोफत करता येतील. आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल तर त्याचे नाव SECC-2011 मध्ये असले पाहिजे. SECC म्हणजे सामाजिक आर्थिक आणि जाति जनगणना. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम mera.pmjay.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.

असा करू शकता ऑनलाइन अर्ज
- सर्वात आधी mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा. 
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका. 
- यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर ओटीपी येईल. 
- ओटीपी नंबर टाका. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
- तेथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात ते राज्य निवडा. 
- यांनंतर तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल नंबर, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा RSBY URN नंबर टाका. 
- तुमचे नाव पेजच्या उजव्या बाजूला दिसत असल्यास, तुम्ही पात्र आहात. 
- तुम्ही 'कुटुंब सदस्य' टॅबवर क्लिक करून लाभार्थी तपशील देखील तपासू शकता. 
- याशिवाय, तुम्ही जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता.

Web Title: how to check ayushman bharat yojana eligibility know all details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.