मुलांमध्ये लठ्ठपणा कशामुळे वाढतोय? काय असतील कारणे; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:40 PM2024-02-29T12:40:55+5:302024-02-29T12:42:31+5:30
काही वर्षांत आधुनिक जीवनशैलीचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे.
Health Tips : काही वर्षांत आधुनिक जीवनशैलीचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. सध्या मुलांचे मैदानी खेळ बंद झाले असून, व्हिडीओ गेम, मोबाइल आणि लॅपटॉपवर खेळत राहण्याचे प्रमाण वाढले आहे. जंक फूड हा महत्त्वाचामुद्दा आहे. मुलांची आहार शैली बदलल्यामुळे लठ्ठपणा वाढीस लागल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
या सवयी टाळा - जंक फूडपासून शक्यतो मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकाच ठिकाणी मुलांना जास्त वेळ बसू देऊ नये.
हे करा - मैदानी खेळाला प्राधान्य द्या. घरचे जेवण देणे उपयुक्त ठरते.
मुले लठ्ठ होण्याच्या प्रमाणात वाढ -
१) राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत लठ्ठपणा जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.
२) यामध्ये इयत्ता ७ वी ते ९ वीमध्ये शिकणाऱ्या १४ हजार २७८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५४० विद्यार्थी लठ्ठ असल्याचे आढळले.
३) विशेष करून मुंबईतील ज्या ९५४ विद्यार्थ्यांची तपासणी झाली त्यात १५९ मुले लठ्ठ आढळली आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण मुंबईत अधिक असल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे वाढतोय लठ्ठपणा - मैदानी खेळाचा अभाव, तळलेले पदार्थ, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक, प्रक्रिया केलेले पदार्थ, हवाबंद डब्यातील पदार्थ, साखर आणि मीठ मोठ्या प्रमाणात असलेले पदार्थ, व्हिडीओ गेम, मोबाइल आणि लॅपटॉपवर खेळत राहणे
आपले मूल गुटगुटीत असणे, सदृढ असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. मात्र, वयाने मोठ्या झाल्यानंतरच्या समस्या त्यांना जर शाळेच्या वयातच भेडसावायला लागल्या, तर त्याचे आयुष्य अडचणीत येते. लठ्ठपणामुळे रुग्णालयात जाण्याची गरज भासणार अशा पद्धतीने पालकांनी पाल्याची काळजी घेण्याची गरज आहे.- डॉ. संजय बोरुडे, स्थूलत्व शल्यचिकित्सक