How to Choose the Right Shaving Brush घरीच दाढी करता का? जाणून घ्या योग्य शेविंग ब्रशची निवड कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:23 PM2024-06-13T12:23:59+5:302024-06-13T12:26:30+5:30

How to Choose the Right Shaving Brush : आता चांगल्या क्वालिटीचा शेविंग ब्रश कोणता आहे आणि कुठे मिळेल असा प्रश्न पडत असेल तर चिंता नको. यात आम्ही तुमची मदत करू.  

How to choose the right shaving brush | How to Choose the Right Shaving Brush घरीच दाढी करता का? जाणून घ्या योग्य शेविंग ब्रशची निवड कशी कराल?

How to Choose the Right Shaving Brush घरीच दाढी करता का? जाणून घ्या योग्य शेविंग ब्रशची निवड कशी कराल?

Shaving Brush : बरेच लोक सलूनमध्ये न जाता घरी शेविंग करतात. बऱ्याच लोकांकडे घरी शेविंग कीट असते. ज्यात सगळ्यात वस्तू असतात. पण अनेकदा चुकीच्या आणि खराब क्वालिटीच्या ब्रश किंवा रेजरचा वापर केल्याने त्वचेचं नुकसानही होतं. बरेच लोक क्रीम आणि रेजरवर खूप पैसे खर्च करतात. पण ते शेविंग ब्रश मात्र सामान्य क्वालिटीचा खरेदी करतात. हीच मोठी चूक ठरू शकते. 

त्वचा चांगली राहण्यासोबतच शेव्हही चांगलं होण्यासाठी एक चांगल्या क्वालिटीचा शेविंग ब्रश खरेदी करायला हवा. आता चांगल्या क्वालिटीचा शेविंग ब्रश कोणता आहे आणि कुठे मिळेल असा प्रश्न पडत असेल तर चिंता नको. यात आम्ही तुमची मदत करू.  

एक चांगल्या क्वालिटीचा शेविंग ब्रश कसा खरेदी कराल आणि एक चांगला शेविंग ब्रश कसा असतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चांगल्या शेविंग ब्रशची निवड करताना खालील २ गोष्टी लक्षात ठेवा. 

१) शेव्हिंग ब्रशचे दाते

जर ब्रशचे दाते फार कडक असतील तर त्यात पाणी पकडून ठेवण्याची क्षमता कमी असते. यामुळे फेस अधिक तयार होण्यास अडचण येते. जर तुम्हाला चांगला ब्रश हवा असेल तर मजबूत आणि मुलायम दाते असलेला शेविंग ब्रश घ्यावा.

आधी लोक डुक्कर, घोड्यांच्या केसांपासून बनवलेल्या शेविंग ब्रशचा वापर करत होते. आजकाल सिंथेटिक शेविंग ब्रश उच्च गुणवत्तेच्या पॉलिएस्टरपासून बनलेले असतात. जे त्वचेला मुलायम लागत.

२) हॅंडलचा आकार

शेविंग ब्रशचं हॅंडल तुमच्या हातात फीट बसायला हवं. तसेच फेस तयार करताना एक चांगली ग्रिपही असली पाहिजे. ब्रश तीन भागांनी बनलेला असतो. ब्रिसल्स, एक नॉट आणि एक हॅंडल. एकंदर काय तर अशा शेविंग ब्रशची निवड करा जे तुमच्या हातात चांगला बसेल.

बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे शेविंग ब्रश उपलब्ध असतात. पण त्यातील अधिक चांगले कोणते आहे हे ठरवणं जरा अवघड होऊ जातं. अशात आम्ही तुम्हाला काही शेविंग ब्रशची माहिती देणार आहोत.

बॅजर (Badger)

बॅजर म्हणजे चांदीअस्वलाच्या केसांपासून बनवेला ब्रश बरेच फेमस आहे. या ब्रशचे दाते त्वचेसाठी मुलायम आणि कोमल असतात. या केसांमध्ये बरंच पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. बॅजर हेअर शेविंग ब्रश पाणी धरून ठेवण्यासाठी आणि उष्णता कायम ठेवण्यामुळे बरेच पसंत केले जातात.

या शेविंग ब्रशची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3VFmZ6F

बोअर (Boar)

डुकरांचे केस बॅजरच्या केसांच्या तुलनेत मजूबत असतात आणि थोडे जाड असतात. हे केस त्वचेसाठी सहज वाटतात. हे केस शेविंग क्रीमपासून फेस बनण्यासाठी आदर्श मानले जातात. 

या शेविंग ब्रशची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3KHlHla

सिंथेटिक (Synthetic)

सिंथेटिक ब्रश फार आधीपासून वापरले जातात. जास्तीत जास्त लोक सिंथेटिक ब्रशचा वापर करतात. अनेक सिथेंटिक ब्रश आणि हाय क्वालिटी असलेल्या बॅजर ब्रशमध्ये अंतर करणं अवघड होतं. त्यामुळे प्रोडक्ट पेज/पॅकेजिंग वाचलं पाहिजे की हा ब्रश सिंथेटिक आणि क्रुएलिटी फ्री आहे.

Disclaimer: या लेखात दिलेल्या ऑफर्स, डिस्काउंट आणि प्रोडक्ट्सची माहिती अ‍ॅमेझॉन वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. यात लेखकाचे वैयक्तिक विचार नाहीत. 

Web Title: How to choose the right shaving brush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.