लिव्हर आणि किडनीची सफाई करणारं खास डिटॉक्स ड्रिंक, जाणून घ्या कसं कराल तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 09:58 AM2024-11-30T09:58:37+5:302024-11-30T09:59:41+5:30
Body Detox Drink : आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रोबिन शर्मा यांनी एक कमी खर्चाचा सोपा उपाय सांगितला आहे. ज्याद्वारे शरीराची आतून सफाई करता येईल.
Body Detox Drink : आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. शरीर आतून कमजोर होत आहे. रोज शरीरात टॉक्सिन जमा होतात. हे रक्त, किडनी, लिव्हर आणि फुप्फुसांसारख्या अवयवांमध्ये जमा होतात. जर यांची स्वच्छता केली गेली नाही तर कॅन्सर, इन्फेक्शनसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशात आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रोबिन शर्मा यांनी एक कमी खर्चाचा सोपा उपाय सांगितला आहे. ज्याद्वारे शरीराची आतून सफाई करता येईल.
एक्सपर्टनी सांगितलं की, केवळ २ रूपये खर्च करून तुम्ही लिव्हर-किडनी किंवा पूर्ण शरीर डिटॉक्स करू शकता. एका खास डिटॉक्स ड्रिंकचं सेवन करून तुम्ही ३० दिवसात ९ समस्या कमी करू शकता. चला जाणून घेऊ काय आहे हे डिटॉक्स ड्रिंक आणि कसं करावं त्याचं सेवन.
लिवर-किडनी होईल डिटॉक्स
डॉ. रोबिन शर्मा यांनी किडनी आणि लिव्हर डिटॉक्स करण्याची पद्धत सांगितली आहे. जेव्हा किडनी आणि लिव्हर टॉक्सिनच्या संपर्कात येते तेव्हा दोन्ही अवयव त्यांची कामे व्यवस्थित करत नाहीत. ज्यामुळे सूज येऊ शकते आणि हळूहळू हे अवयव डॅमेज होऊ शकतात.
कोणत्या समस्या होतील दूर?
या डिटॉक्स ड्रिंकने लिव्हर टॉक्सिनची समस्या, किडनीतील विषारी पदार्थाची समस्या, बॉडी डिटॉक्स, अॅसिडिटी, यूरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन, किडनी स्टोन, पीसीओडी किंवा पीसीओएस, वाढलेलं वजन, हाय ब्लड शुगर अशा समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.
कसं तयार कराल जवाचं ड्रिंक?
जव या धान्यातून आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच जवाच्या मदतीने अनेक रोगांपासूनही बचाव केला जाऊ शकतो. जव ही गव्हाचीच एक प्रजाती आहे. पण जव गव्हाच्या तुलनेत हलकं आणि जाड धान्य आहे. जवामध्ये मुख्यत्वे लेक्टिक अॅसिड, सॅलिसिलीक अॅसिड, फॉस्फोरिक अॅसिड, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम उपलब्ध असतात.
मुठभर जव २ ग्लास पाण्यात उकडा. जेव्हा पाणी एक ग्लास शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. नंतर हे गाळून घ्या. हे पाणी अर्धा ते एक तासात एक एक घोट करत सेवन करा.लागोपाठ ३० दिवस याचं सेवन केल्याने वेगवेगळ्या समस्या दूर होतील.