दातांवरील पिवळे दूर करण्यासाठी तुरटीचा 'असा' करा वापर, दात होतील चमकदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 02:58 PM2024-06-28T14:58:56+5:302024-06-28T15:04:07+5:30

Teeth Health : आज आम्ही दातांवरील पिवळेपणा किंवा पिवळा थर दूर करण्यासाठी एक खास उपाय सांगणार आहोत.

How to clean teeth with fitkari or alum, know how to make it | दातांवरील पिवळे दूर करण्यासाठी तुरटीचा 'असा' करा वापर, दात होतील चमकदार!

दातांवरील पिवळे दूर करण्यासाठी तुरटीचा 'असा' करा वापर, दात होतील चमकदार!

Teeth Health : तंबाखू, गुटखा किंवा तोंडाची स्वच्छता व्यवस्थित न केल्याने दातांवर पिवळा घट्टा थर जमा होतो. अशात चारचौघात मोकळेपणाने हसताही येत नाही. कारण आपले पिवळे दात दाखवण्याची अनेकांना लाज वाटते. पण हे लोक दात स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करतात. दातांची स्वच्छता वेगवेगळ्या पद्धतीने केली जाऊ शकते. लोक दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी वेगवेगळेय उपायही करत असतात. पण सगळ्यांनाच फायदा मिळतो असं नाही. अशात आज आम्ही दातांवरील पिवळेपणा किंवा पिवळा थर दूर करण्यासाठी एक खास उपाय सांगणार आहोत.

सोडा, गुटखा, तंबाखू, चुकीचं खाणं-पिणं यामुळे दातांचं आरोग्य खराब होतं. दात दुखू लागतात, हिरड्यांमधून रक्त येतं, तोंडाचा वास येतो अशा समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी तुरटीचं मंजन वापरलं तर फायदा होऊ शकतो. हे मंजन तुम्ही घरीच बनवू शकता आणि दातांवरील पिवळे डाग दूर करू शकता.

तुम्हीही अनेकदा वेगवेगळे उपाय करून दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी उपाय केले असतील. पण तुरटीचा वापर कधी केला नसेल. तुरटी ही वेगवेगळ्या उपचारांमध्ये वापरली जाते. तुरटी स्वच्छतेसाठी फायदेशीर मानली जाते. दात स्वच्छ करण्यासाठीही तुम्ही तुरटीचा वापर केला पाहिजे. तुरटीमध्ये असे काही तत्व असतात जे दातांवरील पिवळेपणा दूर करतात. 

तुरटीचं पावडर तयार करून त्याने तुम्ही दात घासू शकता. याने दात तर स्वच्छ होतीलच सोबतच दातांच्या इतर समस्याही दूर होतील. यात अॅँटी-मायक्रोबिअल गुण असतात जे तोंडातील बॅक्टेरिया दूर करतात. यामुळे दातांच्या वेदना, तोंडाचा वास आणि पायरियापासून बचाव होतो.

कसं तयार कराल तुरटीचं मंजन?

तुरटीचं मंजन तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करा. यात काही तुरटीचे तुकडे टाका. हे तुकडे घट्ट होऊ द्या. तुरटी पाणी आटून दाणेदार होऊ द्या. ही तुरटी मिक्सरमधून बारीक करा. यात ५ ते ६ लंवग बारीक करा. तुरटी, लवंग आणि २ चमचे बेकिंग सोडा बारीक करा.

दात याने कसे स्वच्छ कराल?

तुरटीच्या मंजनाने दात रात्री घासावे. यासाठी हे मंजन टूथपेस्टसोबत ब्रशवर लावून वापरू शकता. आता आतून बाहेरून चांगले घासा. त्यानंतर तोंड धुवा. काही दिवसांनी तुम्हाला फरक दिसून येईल. 

Web Title: How to clean teeth with fitkari or alum, know how to make it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.