आयुर्वेदानुसार आवळ्याचं सेवन कसं करावं? जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:26 PM2024-11-27T16:26:06+5:302024-11-27T16:32:50+5:30

Amla health benefits : आवळ्याच्या माध्यमातून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासोबतच आवळ्याचे आणखीही अनेक फायदे मिळतात. तसेच आयुर्वेदानुसार, आवळ्याचं सेवन कसं करावं हेही जाणून घेऊ.

How to consume Amla according to Ayurveda? | आयुर्वेदानुसार आवळ्याचं सेवन कसं करावं? जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट!

आयुर्वेदानुसार आवळ्याचं सेवन कसं करावं? जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट!

Amla health benefits : आवळ्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, कार्बोहायड्रेट, फायबरसारखे पोषक तत्व आढळतात. हे पोषक तत्व आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. तसेच आवळ्यामध्ये असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट् आणि व्हिटॅमिन सी मुळे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासूनही बचाव होतो. तसेच आवळ्याच्या माध्यमातून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासोबतच आवळ्याचे आणखीही अनेक फायदे मिळतात. तसेच आयुर्वेदानुसार, आवळ्याचं सेवन कसं करावं हेही जाणून घेऊ.

आयुर्वेदानुसार आवळा कसा खावा?

आयुर्वेदानुसार, आवळे फार जास्त तेल, तिखट आणि मसाल्यांसोबत खाऊ नये. त्याऐवजी आवळे केवळ मिठासोबत खाणं चांगलं असतं. तसेच आवळे बारीक चावून खावेत.

आवळे मिठासोबत खाण्याचे फायदे

- आवळे खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. तसेच जर तुम्ही आवळे रिकाम्या पोटी खाल तर याचे फायदे दुप्पट मिळतील. याने बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्याही कमी होते.

- आवळे केस आणि त्वचेसाठीही अनेक दृष्टीने फायदेशीर असतात. याच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावरील डागही दूर होतील. सोबतच यातील व्हिटॅमिन सी मुळे फ्री रॅडिकल्सपासूनही बचाव होतो.

- त्याशिवाय आवळ्याच्या सेवनाने डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने ब्लड शुगर लेव्हल हेल्दी राहते. सोबतच हाय ब्लड प्रेशरची समस्याही कंट्रोल राहतो.

- आवळ्याने वजन कंट्रोल करण्यासही मदत मिळते. जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करावं.
 

Web Title: How to consume Amla according to Ayurveda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.