आतड्या साफ करण्यासाठी बेस्ट आहेत या तीन भाज्या, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:12 PM2023-12-15T16:12:20+5:302023-12-15T16:12:53+5:30

आतड्यांमध्ये जमा झालेले हा विषारी पदार्थ स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. पोट साफ नसल्याने अनेक गंभीर आजार होतात.

How to detox intestines add these 3 vegetables in your diet to clean intestines naturally | आतड्या साफ करण्यासाठी बेस्ट आहेत या तीन भाज्या, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली नावे

आतड्या साफ करण्यासाठी बेस्ट आहेत या तीन भाज्या, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली नावे

शरीराची बाहेरील स्वच्छता नेहमीच केली जाते. पण तुम्हाला शरीर आतून कसं स्वच्छ करायचं हे माहीत आहे का? शरीरात हवा आणि खाण्या-पिण्याच्या माध्यमातून अनेक विषारी पदार्थ जमा होतात. तशा तर आपल्या किडनी शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर काढतात. पण तरीही अनेक अपशिष्ट पदार्थ आतड्यांमध्ये चिकटून राहतात.

आतड्यांमध्ये जमा झालेले हा विषारी पदार्थ स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. पोट साफ नसल्याने अनेक गंभीर आजार होतात. यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, भूक कमी लागणे, पाइल्स, अॅसिडिटी, वजन कमी होणे, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार अशा समस्या होतात. 

अशात आयुर्वेदिक डॉक्टर चैताली राठोड यांनी सांगितलं की, पोटातील आतड्यांमध्ये जमा असलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तीन भाज्या फार महत्वाच्या ठरतात. चला जाणून घेऊ त्या भाज्यांबाबत...

आतड्या स्वच्छ करण्यासाठी पांढरा भोपळा

पांढरा भोपळा ही फार पौष्टिक आणि चविष्ट भाजी असते. ही भोपळ्याच्या प्रजातींमधील एक प्रजाती आहे. हिवाळ्यात ही भाजी भरपूर मिळते. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

डिटॉक्ससाठी कसं कराल सेवन?

पांढरा भोपळा सेवन करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी याचा ज्यूस प्यावा. याने आतड्या आणि मूत्राशय साफ होतं. तसेच शरीराची ऊर्जा वाढते. वात आणि पित्त दोषही यामुळे कमी होतो.

शेवग्याच्या शेंगा

आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना शिग्रु म्हणतात. यात कॅल्शिअम, आयरन, मॅग्नेशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि इतरही आरोग्यासाठी फायदेशीर तत्व असतात. याच्या सेवनाने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

डिटॉक्ससाठी कसं कराल सेवन?

डॉक्टरांनी सांगितलं की, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा सूप, ज्यूस किंवा भाजी खाऊ शकता. याने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतील.

आतड्यांची स्वच्छता करेल आलं

कफ आणि वात दोष दूर करण्यासाठी आलं सगळ्यात चांगलं मानलं जातं. तसेच याने बद्धकोष्ठताही दूर होते. जुनी श्वास घेण्याची समस्या, अस्थमा, लठ्ठपणा, आतड्यांची स्वच्छता यात हे फार फायदेशीर असतं.

डिटॉक्ससाठी कसं कराल सेवन?

पोट आणि आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही सगळ्या भाज्यांमध्ये एक आल्याचा तुकडा बारीक करून टाकू शकता. डॉक्टरांनी सांगितलं की, हे केल्यावर तुम्हाला 10 दिवसात फरक दिसून येईल.
 

Web Title: How to detox intestines add these 3 vegetables in your diet to clean intestines naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.