किडनीसाठी टॉनिक ठरतात या 5 भाज्या, कानाकोपऱ्यातून काढतात विषारी पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 03:54 PM2023-09-18T15:54:52+5:302023-09-18T15:56:16+5:30

kidney Cleansing Vegetables: किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास सक्षम नसेल तर ते शरीरात जमा होतील आणि किडनी, लिव्हर व इतर अवयवायांची कामे विस्कळीत होतील.

How to detox kidney and liver eat these 5 vegetables to clean your kidney naturally | किडनीसाठी टॉनिक ठरतात या 5 भाज्या, कानाकोपऱ्यातून काढतात विषारी पदार्थ

किडनीसाठी टॉनिक ठरतात या 5 भाज्या, कानाकोपऱ्यातून काढतात विषारी पदार्थ

googlenewsNext

kidney Cleansing Vegetables:  किडनी शरीरातील महत्वाचा अवयव आहे. जे रक्त शुद्ध करणे आणि विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्याचं काम करतात. तुम्ही जे काही खाता किंवा पिता त्यातील विषारी तत्व गाळण्याचं आणि ते शरीरातून बाहेर काढण्याचं काम किडनी करतात. जर किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास सक्षम नसेल तर ते शरीरात जमा होतील आणि किडनी, लिव्हर व इतर अवयवायांची कामे विस्कळीत होतील. ज्यामुळे किडनी स्टोन, थकवा, पोटदुखी, डोकेदुखी, इडिमासारख्या समस्या होऊ शकतात.

किडनी साफ करण्याचे उपाय

किडनी निरोगी, मजबूत आणि साफ ठेवण्यासाठी खाण्या-पिण्यावर खास लक्ष द्यावं लागतं. चांगली बाब ही आहे की, काही खास भाज्या आणि जडीबुटींचं सेवन केल्याने किडनी साफ आणि निरोगी ठेवण्यास मदत मिळते. न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांनी किडनी साफ करण्यासाठी काही भाज्यांबाबत सांगितलं आहे. ज्यांचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता.

शिमला मिरची (Bell Peppers)

शिमला मिरची किडनीसाठी फायदेशीर असते. कारण यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्याने किडनी साफ करण्यास मदत मिळते. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात जे तुमच्या शरीराला किडनीपासून होणाऱ्या समस्यांपासून वाचवतात.

पालक (Spinach)

पालक किडनीच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर भाजी असते. यात फायबर, फोलेट आणि आयरन भरपूर असतं. जे किडनीला निरोगी ठेवण्यात मदत करतात. पालकाच्या सेवनाने रक्तही शुद्ध होतं आणि किडनी स्टोन वाढण्याचाही धोका कमी राहतो.

गाजर 

गाजरही किडनीच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. कारण यात व्हिटॅमिन ए भरपूर असतं. जे किडनी आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं. गाजराच्या सेवनाने किडनीची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते.

टोमॅटो 

टोमॅटोमध्ये लायकोपीन असतं, जे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याने किडनी स्टोन होण्याचा धोकाही कमी होतो. तसेच शरीरातील अ‍ॅसिडही नियंत्रित करतात.

लाल मिरची 

लाल मिरच्यांमध्ये पोटॅंशिअमचं प्रमाण कमी असतं. जे किडनीची समस्या असलेल्यांसाठी अवघड ठरू शकतं. यात व्हिटॅमि न सी, फोलेट, व्हिटॅमिन बी6 आणि फायबरही भरपूर असतं. व्हिटॅमिन सी एक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे. याने शरीरात एनर्जी, ब्लड फ्लो आणि मेटाबॉल्जिम वाढण्यास मदत मिळते. लाल मिरच्यांमध्ये लायकोपीन असतं, जे एक शक्तीशाली अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे जे किडनीला निरोगी ठेवतं.

Web Title: How to detox kidney and liver eat these 5 vegetables to clean your kidney naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.