रक्त शुद्ध करण्यासाठी खास सोपे उपाय, शरीरातील सगळे विषारी पदार्थ पडतील बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 14:48 IST2022-12-29T14:48:39+5:302022-12-29T14:48:59+5:30
How To Detox Your Body: रक्ताद्वारेच ऑक्सीजन पूर्ण शरीरात पोहोचतं त्यामुळे ते शुद्ध राहणं फार गरजेचं आहे. अशात कोणत्या गोष्टींनी रक्त शुद्ध करता येईल हे आम्ही सांगणार आहोत.

रक्त शुद्ध करण्यासाठी खास सोपे उपाय, शरीरातील सगळे विषारी पदार्थ पडतील बाहेर
How To Detox Your Body: स्वत:ला निरोग आणि फीट राहण्यासाठी सगळेच काहीना काही करत असतात. आपल्या शरीरात अनेक विषारी पदार्थ असतात जे बाहेर काढणं फार गरजेचं असतं. असं केलं नाही तर अनेक आजार होण्याची शक्यता असते. बॉडी डिटॉक्स केल्यावर रक्त शुद्ध होतं. रक्ताद्वारेच ऑक्सीजन पूर्ण शरीरात पोहोचतं त्यामुळे ते शुद्ध राहणं फार गरजेचं आहे. अशात कोणत्या गोष्टींनी रक्त शुद्ध करता येईल हे आम्ही सांगणार आहोत.
लिंबू - लिंबाचं सेवन करण्याचा सल्ला जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट देत असतात. यातील अॅसिडीक तत्वांमुळे रक्त शुद्ध करण्यास मदत मिळते. जर तुम्ही रोज एक ग्लास लिंबूपाणी प्यायलात तर रक्त शुद्ध होईल आणि लघवीच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन बाहेर निघतील.
आलं आणि गुळाचा चहा - आपण रोज जो दुधाचा आणि साखरेचा चहा पितो त्याने आरोग्याचं नुकसान होतं. त्याऐवजी आलं आणि गूळ टाकून चहा तयार करा. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. सोबतच रक्तही शुद्ध राहतं.
कोथिंबिर आणि पुदीन्याचा चहा - कोथिंबिर आणि पुदीन्याची पाने आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. याने बॉडी डिटॉक्स होते, ज्यामुळे पोटासंबंधी समस्याही दूर होतात. यासाठी तुम्ही कोथिंबिर आणि पुदीन्याच्या पानांची हर्बल चहा तयार करा.
तुळशीच्या पानांचा चहा - भारतात बरेच लोक तुळशीचं झाड आपल्या अंगणात आणि घरात लावत असतात. तुळशीच्या पानांचा फार आधीपासून औषधी म्हणून वापर केला जातो. कारण यात अॅंटीबॅक्टेरिअल आणि अॅंटीवायरल गुण असतात. ही पाने थेट खाऊ शकता नाही तर चहामध्ये टाकू शकता. याने रक्त शुद्ध होतं.