एकाच जागी उभे राहून फक्त १० मिनिटे करा 'ही' एक्सरसाईज, मिळतील एकापेक्षा एक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:45 PM2024-08-12T12:45:34+5:302024-08-12T12:46:59+5:30

Spot Jogging Benefits : महत्वाची बाब म्हणजे हा व्यायाम फक्त एका जागी उभं राहून तुम्हाला करायचा आहे. याचे फायदेही इतर व्यायामांसारखे भरपूर आहेत. हा व्यायाम म्हणजे स्पॉट जॉगिंग.

How to do spot jogging to lose weight and good heart health | एकाच जागी उभे राहून फक्त १० मिनिटे करा 'ही' एक्सरसाईज, मिळतील एकापेक्षा एक फायदे!

एकाच जागी उभे राहून फक्त १० मिनिटे करा 'ही' एक्सरसाईज, मिळतील एकापेक्षा एक फायदे!

Spot Jogging Benefits : बरेच लोक शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी वेगवेगले व्यायाम करतात. काही लोक रोज पायी चालतात तर काही लोक धावायला जातात. पण सगळ्यांनाच हे शक्य होतं असं नाही. काही लोकांना बाहेर जाऊन व्यायाम करणं जमत नाही. मात्र एक असा व्यायाम आहे जो तुम्ही घरातच करू शकता. महत्वाची बाब म्हणजे हा व्यायाम फक्त एका जागी उभं राहून तुम्हाला करायचा आहे. याचे फायदेही इतर व्यायामांसारखे भरपूर आहेत. हा व्यायाम म्हणजे स्पॉट जॉगिंग.

स्पॉट जॉगिंगमध्ये एकाच जागी उभं राहून तुम्हाला धावायचं असतं. ही एक एरोबिक एक्सरसाईज आहे. केवळ १० मिनिटे स्पॉट जॉगिंग करून शरीराला काय काय फायदे मिळतात हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्पॉट जॉगिंग करण्याची पद्धत

हृदय होईल मजबूत

केवळ १० मिनिटे स्पॉट जॉगिंग करून हार्ट रेट वाढतो, ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, स्पॉट जॉगिंग असा व्यायाम आहे ज्याने हृदय मजबूत होतं. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. 

जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, एरोबिक अ‍ॅक्टिविटीचं छोटं सेशनही ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.

एनर्जी आणि स्टॅमिना वाढतो

नियमितपणे स्पॉट जॉगिंगने आपला काम करण्याचा स्टॅमिन वाढतो. यूरोपियन जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजीच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, एरोबिक एक्सरसाईज केल्याने शरीराची ऑक्सीजन वापरण्याची क्षमता वाढते.

वजन होईल कमी

स्पॉट जॉगिंग कॅलरी बर्न करण्यासाठी एक चांगला व्यायाम आहे. हार्वर्ड हेल्थनुसार, एकाच जागी धावल्याने आपल्या वजन आणि इन्टेसिटीच्या आधारावर १० मिनिटात जवळपास १०० कॅलरी बर्न होतात. या कॅलरी वजन कमी करण्यास मदत करतात आणि हेल्दी फॅट कायम ठेवण्यासही मदत करतात. 

Web Title: How to do spot jogging to lose weight and good heart health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.