तुम्हीही पाणी पिताना या चुका करता का? लगेच सुधारा नाही तर होऊ शकतो कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 11:01 AM2023-10-04T11:01:16+5:302023-10-04T11:04:45+5:30

Mistakes While Drinking Water : हेल्थ एक्सपर्टही नेहमी हेच सांगतात की, आपण जेवढं जास्त पाणी पिऊ तेवढं चांगलं असतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरापासून अनेक आजार दूर राहतात.

How to drink water : Do not make mistake while drinking can occur cancer | तुम्हीही पाणी पिताना या चुका करता का? लगेच सुधारा नाही तर होऊ शकतो कॅन्सर

तुम्हीही पाणी पिताना या चुका करता का? लगेच सुधारा नाही तर होऊ शकतो कॅन्सर

googlenewsNext

Mistakes While Drinking Water : पाण्याचं आपल्या जीवनात किती महत्व आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाणी नाही मिळालं तर काय होतं यावरूनच हे कळतं. इतकंच नाही तर आपल्या शरीरातही 75 टक्के पाणी असतं. पाण्याशिवाय आपलं जीवन जगणं अशक्य आहे. हेल्थ एक्सपर्टही नेहमी हेच सांगतात की, आपण जेवढं जास्त पाणी पिऊ तेवढं चांगलं असतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरापासून अनेक आजार दूर राहतात.

पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. डॉक्टरांचा सल्ला असतो की, तुम्ही दिवसातून कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी प्यायला हवं. कारण शरीरात पाण्याची कमी झाली तर सेल्सना योग्यपणे ऑक्सिजन मिळत नाही. पण पाणी पिताना तुम्हाला हेही माहीत असायला हवं की, पाणी पिताना तुम्ही कही चुका तर करत नाही ना? कारण पाणी पिताना काही चुका केल्या तर तुम्हाला समस्याही होऊ शकतात. असाच एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो.
पाणी पिताना केल्या जाणाऱ्या चुका

1) प्लास्टिक बॉटलमधून पिऊ नका पाणी

आजकाल प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. लोक पाणी पिण्यासाठी जास्तीत जास्त प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, प्लास्टिकची बॉटल आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे. एका रिसर्चनुसार, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मायक्रोप्लास्टिक असतात. याने प्लास्टिकचा कचरा पाण्याती मिक्स होतो आणि हेच मायक्रोप्लास्टिक रक्तात पोल्यूशन पसरवतं. यानेच पाणी पिण्याचा मार्ग म्हणजे गळ्याचे अवयव खराब होतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

2) किती पाणी प्यावं?

जर तुम्ही भरपूर पाणी पित असाल तर याने तुम्ही डिहायड्रेशनपासून वाचता. जास्त गरमी असेल तेव्हा भरपूर पाणी प्यायला हवं. शरीरात पाणी कमी झालं तर चक्कर येतात. एक्सपर्ट्स सांगतात की, वयस्क व्यक्तीने शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी प्यावं.

3) पाणी कसं प्यावं?

जास्तीत जास्त लोक पाणी पिताना काही चुका करतात. जसे की, फ्रीजमध्ये ठेवली बॉटल काढून लगेच पाणी पिणे. सोबतच काही लोक एकाचवेळी भरपूर पाणी पितात. इतकंच नाही तर जेवणादरम्यान आणि जेवण केल्यावर लगेच पाणी पितात. जे चुकीचं आहे. हाय मिनरल्स असलेलं पाणी पिणं टाळलं पाहिजे. या सगळ्या सवयींमुळे तुम्ही आजारी पडू शकता. उभं राहून पाणी पिऊ नका. थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावं. 

4) कधी पाणी पिणे फायदेशीर

आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशरची समस्या राहत नाही आणि झोपण्याआधी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. एक्सरसाइज केल्यावर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होणार नाही.

5) असं अजिबात करू नका

आयुर्वेदानुसार, पाणी शांतपणे खाली बसून आरामात प्यावे. उभं राहून गटागट पाणी प्यायल्याने पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. तसेच पाणी एकदाच गटागट करून पिऊ नये. एक एक घोट घेत हळू पाणी प्यावे. याचं कारण आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.

Web Title: How to drink water : Do not make mistake while drinking can occur cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.