पुन्हा पुन्हा लघवी येणं आहे मोठी समस्या, शरीर पचवत नाहीये पाणी; एक्सपर्टने सांगितला खास उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 11:52 AM2023-04-24T11:52:51+5:302023-04-24T12:14:46+5:30
Right Way To Drink Water : न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, आपल्या शरीराच्या सगळ्या मांसपेशी आणि नसांसाठी मिनरल्स व मीठ गरजेचं असतं. जे पाण्यात असतं.
Right Way To Drink Water : सध्या उन्हाचा तडाखा फारच वाढला आहे. त्यामुळे हायड्रेट (Hydration) राहण्यासाठी सगळेच एक्सपर्ट भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण दूषित किंवा अशुद्ध पाणी पिणं टाळलं पाहिजे. ज्यामुळे जास्तीत जास्त लोक फिल्टर किंवा आरओचं पाणी पितात.
पाणी स्वच्छ करताना फिल्टर-आरओ पाण्यातील अनेक मिनरल्सही काढून टाकतात. जे याच्या अवशोषणासाठी गरजेचे असतात. न्यूट्रिशनिस्ट रिद्धिमा बत्राने सांगितलं की, या मिनरल्सशिवाय पाणी प्यायल्याने पाण्याचा शरीराला हवा तो फायदा न मिळण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे पुन्हा पुन्हा लघवी येते. म्हणजे लघवीतून सगळे मिनरल्स बाहेर निघून जातात. अशात जाणून घेऊया पाणी पिण्याची योग्य पद्धत...
शरीरासाठी गरजेचे आहेत मिनरल्स
न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, आपल्या शरीराच्या सगळ्या मांसपेशी आणि नसांसाठी मिनरल्स व मीठ गरजेचं असतं. जे पाण्यात असतं. या मिनरल्सना इलेक्ट्रोलाइट म्हटलं जातं. ज्यांची नावं पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, क्लोराइड इत्यादी असतात.
इलेक्ट्रोलाइट कमी होण्याची कारणं
शरीरातून घामासोबत इलेक्ट्रोलाइटही निघून जातात. जेव्हा जास्त घाम निघतो तेव्हा यांची लेव्हल वेगाने कमी होते. हीट व्हेव, उष्ण वारा, एक्सरसाइज, तणाव आणि आजारांमुळे जास्त घाम जातो.
फिल्टर किंवा आरओच्या पाण्यात टाका या गोष्टी
समुद्री मीठ
लिंबाचा तुकडा
आल्याचा तुकडा
कलिंगडाचे तुकडे
नारळाच्या पाण्याचं करा सेवन
इलेक्ट्रोलाइट मिळवण्यासाठी नारळाच्या पाण्याचं सेवन करू शकता. यात काहीच मिक्स करण्याची गरज नाही. कारण यातच नैसर्गिक रूपाने आवश्यक ते मिनरल्स असतात.
पाण्यात कशा मिक्स कराल या गोष्टी
या गोष्टी पाण्यात मिक्स करण्यासाठी फिल्टर किंवा आरओचं पाणी एका मोठ्या जगामध्ये किंवा भांड्यात काढा. नंतर यात वर सांगण्यात आलेल्या गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट मिक्स करा. पाणी 2 ते 3 तास तसंच ठेवा. त्यानंतर त्याचं सेवन करा.