तुम्ही या चुकीच्या पद्धतीने पाणी पिता का? वेळीच व्हा सावध, जाणून घ्या खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 09:07 AM2023-02-25T09:07:26+5:302023-02-25T09:07:48+5:30
How To Drink Water : पाणी कधी आणि कसं प्यावं? याचीही पद्धत आहे. कारण यामुळे शरीराचं पचनतंत्र, मेटाबॉलिज्म, हार्मोन इत्यादी गोष्टी प्रभावित होतात. चला जाणून घेऊ पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे.
How To Drink Water : आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की, पाणी आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं असतं. पाण्याने केवळ तहानच भागवली जाते असं नाही तर यामुळे आपलं शरीर हायड्रेट राहतं आणि शरीर हेल्दी राहण्यासाठी पाणी शरीराला आवश्यक पोषक तत्व देतं. पण तुम्ही कधी पिण्याची हेल्दी पद्धत काय आहे याचा विचार केला का? पाणी कधी आणि कसं प्यावं? याचीही पद्धत आहे. कारण यामुळे शरीराचं पचनतंत्र, मेटाबॉलिज्म, हार्मोन इत्यादी गोष्टी प्रभावित होतात. चला जाणून घेऊ पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे.
1) सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायला हवं. याला आयुर्वेदात उषापान म्हटलं जातं. निरोगी राहण्यासाठी सकाळी कोमट किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी सेवन केलं पाहिजे. या सवयीमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
2) जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिणं चुकीचं आहे. जर जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायलात तर पचन व्यवस्थित होणार नाही. तसेच याने मेटाबॉलिज्म होईल आणि पचन अग्नी कमी होईल.
3) पाणी नेहमीच खाली बसून शांतपणे प्यावं. उभं राहून किंवा घाईघाईने पाणी पिऊ नये. असं केल्यास पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाही. पाणी एक एक घोट असंच प्यावं.
4) पाणी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवू नका. असं केल्यास प्लास्टिकमधील मायक्रो पार्टिकलमुळे कॅन्सरचा धोक वाढतो. सोबतच याने हार्मोनल असंतुलन आणि इतर आजारांचाही धोका वाढतो.
सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे
- रोज सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.
- मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी होऊ शकते. जर तुम्ही रोज सकाळी कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या होणार नाही.
- सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी तत्व लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतात. याने कोलेजन उत्पादनाला चालना मिळते आणि त्वचाही हेल्दी राहते.
- कोमट पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म मजबूत राहतं. ज्यामुळे शरीराला एक्स्ट्रा फॅट तोडण्यास मदत मिळते.