बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण आणि गुळाचं कसं करावं सेवन? जाणून घ्या पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:28 AM2024-08-07T11:28:50+5:302024-08-07T11:45:33+5:30

Garlic And Jaggery Benefits : कच्च्या लसणासोबत गूळ मिक्स करून सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल विरघळून शरीरातून लगेच बाहेर येईल.

How to eat garlic and jaggery to reduce high cholesterol from body | बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण आणि गुळाचं कसं करावं सेवन? जाणून घ्या पद्धत

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण आणि गुळाचं कसं करावं सेवन? जाणून घ्या पद्धत

Garlic And Jaggery Benefits : भारतीय घरांमध्ये लसणाचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जात. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये, पदार्थांमध्ये लसूण वापरला जातो. लसणाने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबतच याचे आयोग्यालाही अनेक फायदे होतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा लसूण फार उपयोगी ठरतो. फक्त यात एक गोष्ट मिक्स करावी लागेल. 

कच्च्या लसणासोबत गूळ मिक्स करून सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल विरघळून शरीरातून लगेच बाहेर येईल. तसेच याचे शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

कसं करावं लसूण आणि गुळाच सेवन?

कच्चा लसूण आणि गूळ एकत्र बारीक करून तुम्ही याच सेवन करू शकता. असेच आधी कच्चा लसूण खाऊन तुम्ही वरून गूळ खाऊ शकता. याने कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळेल.

गूळ आणि लसणाची ही चटणी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. याने शरीराला नकीच फायदा मिळेल आणि शरीरात जमा झालेले बड कोलेस्ट्रॉल बाहेर निघण्यास मदत होईल.

हा उपाय कारण खूप गरजेचं आहे. कारण जर शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका खूप जास्त वाढतो. अशात हा आयुवेर्दिक उपाय करून तुम्ही ही गंभीर समस्या दूर करू शकता.

कच्चा लसूण खाण्याचे फायदे

हृदयरोगांचा धोका होईल कमी

आजकाल बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे हृदयरोगांचा धोका खूप वाढत चालला आहे. जगभरात हृदयरोगांमुळेच सगळ्यात जास्त जीव जातात. कमी वयाच्या लोकांमध्येही हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर हार्टसंबंधी समस्या सतत वाढत आहेत. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्याआधी लसणाच्या 1 किंवा दोन कळ्या खाऊ शकता. लसणामध्ये आढळणाऱ्या एलिसिन नावाच्या तत्वामुळे हाय ब्लड प्रेशर लेव्हल आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. 

डायजेशन मजबूत होतं

ज्या लोकांचं डायजेस्टिव सिस्टम फार कमजोर होतं आणि ज्यांना नेहमीच अपचन, डायरिया, पोटात गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या होतात त्यांना दिवसभर सुस्ती, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. पचनशक्ती सुधारण्यासाठी लोकांनी रात्री लसणाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर

मधुमेह म्हणजे डायबिटीसच्या आजारात ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवणं फार जास्त महत्वाचं असतं. शुगर लेव्हल अनियंत्रित झाल्यास डायबिटीससंबंधी समस्या वाढू शकता किंवा जास्त गंभीर होऊ शकतात. शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक किंवा दोन लसणाच्या कळी खाव्या.

रात्री लसूण खाण्याची पद्धत

कच्चा किंवा भाजलेला लसूण

जर शक्य असेल तर रात्री झोपण्याआधी 1 किंवा दोन लसणाच्या कच्च्या कळ्या चावून खाव्यात. त्यानंतर थोडं पाणी प्यावं. जर तुम्ही कच्चा लसूण खात नसाल तर तूपामध्ये हलक्या भाजलेल्या लसणाच्या एक-दोन कळ्या चावून खाऊ शकता.

Web Title: How to eat garlic and jaggery to reduce high cholesterol from body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.