या हेल्दी ड्रिंकचं नियमित करा सेवन, शरीरातून बर्फासारखं वितळून जाईल कोलेस्ट्रॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 04:02 PM2022-09-05T16:02:50+5:302022-09-05T16:03:18+5:30

How to Reduce Bad Cholestrol: चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि तणावामुळे रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. अशात तुम्हाला हार्ट अटॅक किंवा हार्टसंबंधी इतर समस्या होण्याचा धोका अधिक असतो.

How to get rid from bad cholesterol? Healthy drinks you should know about this | या हेल्दी ड्रिंकचं नियमित करा सेवन, शरीरातून बर्फासारखं वितळून जाईल कोलेस्ट्रॉल

या हेल्दी ड्रिंकचं नियमित करा सेवन, शरीरातून बर्फासारखं वितळून जाईल कोलेस्ट्रॉल

Next

How to Reduce Bad Cholestrol:  आजकाल खाण्या-पिण्याच्या पूर्ण सवयी बदलल्या आहेत. आजच्या लाइफस्टाईलमध्ये आपण काय खायला हवं काय खायला नको याचा जराही लोकांना अंदाज नाहीये. व्यक्ती शरीरात दोन प्रकारचं कोसेस्ट्रॉल असतं. एक बॅड कोलेस्ट्रॉल आणि एक गुड कोलेस्ट्रॉल. शरीरात गुड कोलेस्ट्रॉल असणं फार गरजेचं आहे. पण लठ्ठपणा, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि तणावामुळे रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. अशात तुम्हाला हार्ट अटॅक किंवा हार्टसंबंधी इतर समस्या होण्याचा धोका अधिक असतो. अशात हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की, कशाप्रकारची डाएट फॉलो करावी.

सोया मिल्क

सोयाबीनची सर्वात जास्त शेती मध्य प्रदेशातील मालवामध्ये होते. सोयाबीनपासून अनेक पदार्थ तयार केले जातात. जे रोजच्या आहारात असतात. यापासून तयार दुधाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळू शकते. सोयामिल्कमध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असतं, जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं. सोया मिल्कचं रोज सेवन केलं तर हृदयरोगांचाही धोका कमी केला जाऊ शकतो.

टोमॅटोचा रस

टोमॅटोचा जास्तीत जास्त वापर भाजीला टेस्ट देण्यासाठी केला जातो. टोमॅटोची कच्ची पेस्ट त्वचेसाठीही फायदेशीर मानली जाते. तेच ज्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं आहे, त्या लोकांनी रोज टोमॅटोचं ज्यूस प्यावं. कारण यात लायकोपीन नावाचं तत्व असतं. जे लिपिड स्तरात सुधारणा करण्यात मदत करतं आणि शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं.

ओट्स ड्रिंक

फिटनेसच्या डाएट लिस्टमध्ये ओट्स नेहमीच वरच्या क्रमांकावर असतं. कारण हा सर्वात हलका आणि पौष्टिक नाश्ता मानला जातो. याच्या मदतीने प्रोटीनची स्मूदीही तयार करू शकता. ज्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. याने आतड्यांची सुरक्षा केली जाते. याने आतड्यांमध्ये असलेले विषारी तत्व बाहेर पडतात. यात बीटा-ग्लूकेन्स असतात. याने आतड्यांमध्ये एक जेलसारखा पदार्थ तयार होतो, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं.

बेरी स्मूदी

बेरी खाल्ल्यानंतर न्यूरॉन्स अॅक्टिव होतात. याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. बेरीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे दोन्ही तत्व कोलेस्ट्रॉलचं प्रमाण बॅलन्स करण्यास मदत करतात. याच्या नियमित सेवनाने चेहऱ्यासंबंधी समस्याही दूर होतात.

Web Title: How to get rid from bad cholesterol? Healthy drinks you should know about this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.