खोबऱ्याच्या तेलात या दोन गोष्टी मिक्स वापरल्या तर काही दिवसात काळे होतील पांढरे केस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 04:22 PM2022-09-07T16:22:50+5:302022-09-07T16:22:55+5:30

White Hair Problem : खोबऱ्याच्या तेलाचा वापर रामबाण मानला जातो. या तेलाचा वापर जखमा भरण्यासाठी आणि चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठीही केला जातो. जर खोबऱ्याच्या तेलात काही मिश्रण करून ते वापरलं तर काही दिवसांतच तुमचे पांढरे केस काळे होऊ शकतात.

How to get rid from white hair to black naturally permanent | खोबऱ्याच्या तेलात या दोन गोष्टी मिक्स वापरल्या तर काही दिवसात काळे होतील पांढरे केस

खोबऱ्याच्या तेलात या दोन गोष्टी मिक्स वापरल्या तर काही दिवसात काळे होतील पांढरे केस

googlenewsNext

White Hair Problem : आजकाल केमिकलयुक्त शॅम्पू, साबणाच्या वापरामुळे कमी वयातच काळे केस पांढरे होऊ लागतात. ही समस्या जगभरातील जास्तीत जास्त लोकांना होत आहे. पण कुणालाही हे ठोसपणे माहीत नाही की, या समस्येपासून सुटका कशी मिळवायची. मात्र, असे अनेक घरगुती उपाय आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही पांढरे केस काळे करू शकता. खोबऱ्याच्या तेलाचा वापर रामबाण मानला जातो. या तेलाचा वापर जखमा भरण्यासाठी आणि चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठीही केला जातो. जर खोबऱ्याच्या तेलात काही मिश्रण करून ते वापरलं तर काही दिवसांतच तुमचे पांढरे केस काळे होऊ शकतात. चला जाणून घेऊ उपाय...

खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचा रस

अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि केमिकलच्या वापरामुळे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे ते लगेच ठीक केले जाऊ शकत नाहीत. पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करा आणि केसांच्या मुळात लावा. केसांच्या मुळात या तेलाने चांगली मालिश करा. लिंबाच्या रसात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे ऑक्सिडेटिव स्ट्रेस दूर करण्यास मदत करतात. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा वापरा.

हे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाटीत खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. साधारण 1 तासानंतर हे तेल केसांच्या मुळात लावा, चांगली मालिश करा. काही दिवस ही क्रिया केल्यावर लवकरच पांढरे केस काळे होऊ लागतील.

खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ता

हे दोन्ही मिश्रण पांढरे केस काळे करण्यासाठी रामबाण उपाय मानले जातात. जर तुमचेही केस कमी वयात पांढरे झाले असतील तर तुम्हीही हे घरगुती उपाय ट्राय करू शकता. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ताही वापरू शकता. यासाठी एका वाटीमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल गरम करा. त्यात कढीपत्ता टाका. थोड्या वेळाने हे तेल डोक्याच्या त्वचेवर लावा. काही महिन्यात तुमचे केस पुन्हा काळे होतील.

Web Title: How to get rid from white hair to black naturally permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.