Acidity मुळे काही खाणं-पिणंही झालंय अवघड? या घरगुती उपयांनी लगेच मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 04:35 PM2024-09-26T16:35:16+5:302024-09-26T16:35:43+5:30

Acid Reflux: तुम्हाला सुद्धा अ‍ॅसिडिटीची समस्या नेहमीच होत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला औषध घेण्याची गरज नाही. कारण काही घरगुती नॅचरल उपायांनी या समस्येपासून तुम्ही सुटका मिळवा शकता. 

How to get rid of acidity instantly, know the home remedies | Acidity मुळे काही खाणं-पिणंही झालंय अवघड? या घरगुती उपयांनी लगेच मिळेल आराम!

Acidity मुळे काही खाणं-पिणंही झालंय अवघड? या घरगुती उपयांनी लगेच मिळेल आराम!

Acid Reflux: तेलकट, मसालेदार पदार्थ जास्त खाल्ले किंवा खाण्या-पिण्यात कोणतीही गडबड झाली की, अनेकांना अ‍ॅसिडिटीची समस्या होते. अ‍ॅसिडिटी झाल्यावर छातीत जळजळ होते किंवा आंबट ढेकर येऊ लागतात. काही लोकांना तर छातीत इतकी जळजळ होतं की, त्यांचा उठणं-बसणंही अवघड होऊन जातं. तुम्हाला सुद्धा अ‍ॅसिडिटीची समस्या नेहमीच होत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला औषध घेण्याची गरज नाही. कारण काही घरगुती नॅचरल उपायांनी या समस्येपासून तुम्ही सुटका मिळवा शकता. 

अ‍ॅसिडिटीचे घरगुती उपाय

बडीशेपचं पाणी

बडीशेपच्या सेवनाने पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. बडीशेप तुम्हीही अशीही खाऊ शकता आणि याच्या पाण्याचं देखील सेवन करू शकता. एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप टाकून पाणी उकडून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर गाळून प्यावे आणि बडीशेप चावून खावी.

एलोव्हेरा ज्यूस

अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी एलोव्हेरा ज्यूस हा एक बेस्ट उपाय मानला जातो. एलोव्हेरा ज्यूसने पोटाला थंडावा मिळतो आणि पचनक्रियाची चांगली होते.

बेकिंग सोडा

अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचं पाणी सुद्धा सेवन करू शकता. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाका आणि सेवन करा. बेकिंग सोडा नॅचरल एंटासिडसारखं काम करतं. ज्यामुळे अॅसिडिटी लगेच दूर होते.

थंड दूध

अ‍ॅसिडिटीमुळे पोटात जळजळ जाणवू लागते. अशात ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही थंड दूध सेवन करा. एक ग्लास किंवा एक कप थंड दुधाने अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होईल आणि पोटातील जळजळ सुद्धा.

केळी

फायबर आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असलेल्या केळीने सुद्धा अ‍ॅसिडिटी दूर करण्यास मदत मिळते. जेव्हाही पोटात अ‍ॅसिडिटी वाटत असेल, जळजळ होत असेल तर एक केळी खाऊ शकता.

Web Title: How to get rid of acidity instantly, know the home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.