पोट साफ होण्यासाठी तासंतास जोर लावण्याची येणार नाही वेळ, फॉलो करा 'हे' सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 01:26 PM2024-10-31T13:26:53+5:302024-10-31T13:40:25+5:30
Home Remedies For Constipation: बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी रात्री एक कप दुधात एक गोष्ट मिक्स करून पिऊ शकता. इतरही काही उपायांनी ही समस्या तुम्ही दूर करू शकता.
Home Remedies For Constipation: उत्सवाच्या दिवसांमध्ये घराघरांमध्ये एकापेक्षा एक टेस्टी पदार्थ खाल्ले जातात. बाहेरूनही भरपूर मिठाई आणली जाते. अशात या दिवसात जास्त तेलात तळलेल्या पदार्थांमुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. अनेकांना बद्धकोष्ठतेची म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या होते. टॉयलेटमध्ये तासंतास बसून आणि जोर लावूनही पोट लवकर साफ होत नाही. अशात बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी रात्री एक कप दुधात एक गोष्ट मिक्स करून पिऊ शकता. इतरही काही उपायांनी ही समस्या तुम्ही दूर करू शकता.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपाय
दूध आणि तूप
रात्री एक कप गरम दुधात एक चमचा तूप टाकून सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तूप आणि दुधात लॅक्सेटिव असतं आणि याच्या सेवनाने आतड्या साफ होतात. रात्री अशाप्रकारे दुधाचं सेवन केल्याने सकाळी पोट सहजपणे साफ होतं.
दही आणि अळशीच्या बीया
एक वाटी दुधात अळशीच्या भाजलेल्या बीया टाकून सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. दह्याने पोटाला प्रोबायोटिक्स मिळतात तर अळशीच्या बियांमधून फायबर मिळतं.
आवळ्याचा ज्यूस
एक ग्लास पाण्यात ३० मिली आवळ्याचा ज्यूस मिक्स करून सेवन केल्यास पचनक्रिया चांगली होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
फायबर असलेली फळं
फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या फळांचं सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. सफरचंद, पेरू आणि पेर यातून शरीराला भरपूर फायबर मिळतं.
भरपूर पाणी प्या
बद्धकोष्ठतेची समस्या अनेक डिहायड्रेशनमुळेही होऊ शकते. अशात भरपूर पिणं फायदेशीर ठरू शकतं. केवळ साधं पाणीच नाही तर लिंबू पाणी, फळं किंवा भाज्यांचा ज्यूस सेवन करूनही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करता येते.