पावसाळ्यात घरातील माश्या पळवून लावण्यासाठी वापरा 'या' खास ट्रिक्स, दिसणार नाही एकही माशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:46 AM2024-06-13T10:46:57+5:302024-06-13T10:52:14+5:30
How to get rid of Flies : माश्यांमुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस या रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे या माश्या घरातून पळवून लावण्यासाठी काय करावे तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
How to get rid of Flies : पावसाळा आला की, जसे वेगवेगळे आजार येतात तसे काही कीटकही वाढतात. खासकरून या दिवसांमध्ये डासांसोबत माश्याही घराघरांमध्ये येतात. आरोग्याच्या दृष्टीने हे फार घातक असतं. कारण या दिवसांमध्ये सगळीकडे पाणी चिखल आणि घाण असते ज्यावर माश्या बसलेल्या असतात. त्याच घरात येतात आणि अन्न पदार्थांवर बसतात. तेच आपण खाऊन आजारी पडतो.
माश्यांमुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस या रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे या माश्या घरातून पळवून लावण्यासाठी काय करावे तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही माश्या घराबाहेर काढू शकता.
- कापूर, तुळस, तेल
संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्यात कापराच्या गोळ्या टाका. नुसता कापूर जाळला तरी चालेल. कापराच्या दर्पामुळे माश्या कमी होतात. तसेच तुळशीमध्ये औषधी गुणधर्मासोबत कीटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे. घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो.
त्यासोबतच निलगिरी, लॅव्हेंडर, पेपरमिंट, गवती चहा यासारखी नैसर्गिक तेलांनी कीटकांना दूर ठेवण्यास मदत होते. या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्ब्यात ठेवा. ज्याठिकाणी कीटक असतात तेथे हा डबा उघडा करून ठेवा.
- मीठ आणि लिंबू
एक लिंबू आणि 2 चमचे मीठ व एक ग्लास पाणी घ्या. लिंबू कापून एक ग्लास पाण्यात टाका आणि त्यात मीठ टाका. हे चांगलं मिक्स करा आणि एका स्प्रे च्या बॉटलमध्ये टाका. जिथे माश्या दिसतील तिथे स्प्रे करा.
- तमालपत्र जाळा
वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये तमालपत्र वापरलं जातं. या पानाचा माश्या पळवण्यासाठीही फायदा होतो. तमालपत्र जाळून त्याचा धूर होऊ द्या. या धुरामुळे माश्या पळून जातील.
- अन्न आणि फळं-भाज्या झाकून ठेवा
पावसाच्या दिवसांमध्ये अन्न झाकून ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. अन्न उघडं ठेवल्याने घरात माश्या येतात. फळं-भाज्याही झाकून ठेवा.
- किचन स्वच्छ ठेवा
किचन हे माश्यांची आवडती जागा असते. इथेच सगळ्यात जास्त माश्या राहतात. त्यामुळे किचनमध्ये कचरा उघडा ठेवू नका. कचरा नेहमीच झाकून ठेवा. गॅसचा ओटा ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सने स्वच्छ करा. घरातील लादी डेटॉल किंवा फिनाइलच्या पाण्याने पुसून घ्या.
- खिडक्या-दारं बंद ठेवा
पावसाळ्यात शक्यतो घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा. बाहेरून आल्यावर पाय निट स्वच्छ धुवा. घर हवेशीर ठेवायचं असेल तर खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा.