Teeth Cavity: दातांना लागलेल्या किडीमुळे आहात हैराण, हे घरगुती उपाय करून दूर करा समस्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 01:41 PM2022-06-18T13:41:48+5:302022-06-18T13:42:16+5:30
Teeth Cavity : दात आतून सडतात आणि मोठी समस्या निर्माण होते. यामुळे काही दिवसांनी दात पडू लागतात. या कॅविटीजपासून जेवढ्या लवकर होईल सुटका मिळवावी लागते नाही तर इतर दातही खराब होतात.
Teeth Cavity: दातांची समस्या आजकाल फारच वाढली आहे. दातांना किड लागणं ही समस्या सामान्य झाली आहे. पण अनेकांना वाटतं की, दातांमध्ये किडे होतात. पण तसं नाहीये. दातांना किडे लागत नाही तर काळे डाग खड्डे पडतात. दात आतून सडतात आणि मोठी समस्या निर्माण होते. यामुळे काही दिवसांनी दात पडू लागतात. या कॅविटीजपासून जेवढ्या लवकर होईल सुटका मिळवावी लागते नाही तर इतर दातही खराब होतात.
मुळात फार जास्त गोड खाल्ल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. ज्यामुळे टूथ कॅविटी होते. हे बॅक्टेरिया प्लाकच्या रूपातही दिसू लागतात आणि दातांच्या वरच्या थराचं नुकसान होतं. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही करता येतात. या उपायांनी दातांची किड दूर केली जाऊ शकते.
अंड्याची साल
तुम्ही जर या उपायाबाबात आधी ऐकलं नसेल तर आता जाणून घ्या. अंड्याच्या सालीमध्ये कॅल्शिअम कार्बोनेट आढळून येतं जे दातांच्या नष्ट झालेल्या इनेमलला पुन्हा खनिज देण्याचं काम करतं. याने सडलेला भागही दूर करण्यासही मदत मिळते. यासाठी अंड्याची साल स्वच्छ करून उकडून घ्या आणि बारीक करा. नंतर यात बेकिंग सोडा आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करून हे मिश्रण टूथपेस्टसारखं वापरा.
हर्बल पावडर
हे हर्बल पावडर तयार करणं फारच सोपं आहे आणि याने दातांसोबतच हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्याही दूर होते. हे तयार करण्यासाठी 2 चमचे आवळा, एक चमचा कडूलिंब, अर्धा चमचा दालचीनी, बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा लवंग पावडर मिश्रित करा. या हर्बल पावडरने रोज दातांवर ब्रश करा. काही दिवसात याने तुम्हाला फायदा दिसू लागेल.
खोबऱ्याचं तेल
दातांची किड दूर करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. खोबऱ्याच्या तेलाने ऑइल पुलिंग केल्याने दातांचा प्लाक, बॅक्टेरिया, किड आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. ऑइल पुलिंगचा अर्थ हा होतो की, तोंडात खोबऱ्याचं तेल टाकून 5 ते 10 मिनिटं गुरळा करा आणि थूंका. लक्ष द्या हे खोबऱ्याचं तेल गिळू नका. हे कॅविटीज दूर करण्याचे सर्वात फायदेशीर उपाय आहेत.