सकाळी सकाळी पोटात गॅसची समस्या होते, जाणून गॅस दूर करण्याचे खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 03:45 PM2022-10-10T15:45:34+5:302022-10-10T15:45:56+5:30

How To Get Rid Of Stomach Gas: पोटातील गॅसच्या समस्येवर उपचार करणं फार गरजेचं असतं. नाही तर पुढे जाऊन मोठी समस्या होऊ शकते. जर तुम्हाला सकाळी पोटात गॅसची समस्या होत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How to get rid off bloating and gas problem in stomach home remedies | सकाळी सकाळी पोटात गॅसची समस्या होते, जाणून गॅस दूर करण्याचे खास उपाय

सकाळी सकाळी पोटात गॅसची समस्या होते, जाणून गॅस दूर करण्याचे खास उपाय

googlenewsNext

How To Get Rid Of Stomach Gas: चुकीचं खाणं-पिणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे पोटात गॅस तयार होण्यासारखी समस्या होते. कधी कधी पचन तंत्र बिघडल्यानेही सुद्धा ही समस्या होते. काही लोकांना तर गॅसची समस्या अनेक वर्ष राहते. अशात पोटातील गॅसच्या समस्येवर उपचार करणं फार गरजेचं असतं. नाही तर पुढे जाऊन मोठी समस्या होऊ शकते. जर तुम्हाला सकाळी पोटात गॅसची समस्या होत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

का होते सकाळी गॅसची समस्या?

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, सकाळी पोटात गॅसची समस्या वेगवेगळ्या कारणांनी होते. जर तुम्ही डिनर दरम्यान जास्त सलाद खात असाल तर तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. बीन्स, पत्ताकोबी आणि फ्लॉवरने सुद्धा पोटात गॅस तयार होतो. तसेच जे लोक कमी पाणी पितात त्यांनाही गॅसची समस्या होते. काही महिलांना मासिक पाळी वेळी होर्मोनल इम्बॅलन्समुळे पोटात गॅसची समस्या होते. पोटात इन्फेक्शन झाल्यावरही गॅसची समस्या होते. 

काय कराल उपाय

जर काही खाण्यामुळे पोटात गॅसची समस्या झाली तर तो दूर करण्यासाठी तुम्ही पोटावर हलक्या हाताने मालिश करा. हा उपाय खूप फायदेशीर आहे आणि याने पोटातील गॅस दूर होतो. यासाठी तुम्ही पोटावर एखादं तेल लावा आणि हळूहळू मसाज करा. अॅपल विनेगरही तुमची गॅसची समस्या दूर करतं. यात फायबर अशतं ज्यामुळे तुमची गॅसची समस्या दूर होते. यासाठी एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडं अॅपल साइडर विनेगर टाका. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं.  याने तुमची गॅसची समस्या दूर होईल.
 

Web Title: How to get rid off bloating and gas problem in stomach home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.