डोळ्यांचा चष्मा दूर करण्यासाठी काय करावं? तुम्हालाही माहीत नसतील हे सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:59 AM2024-07-19T10:59:45+5:302024-07-19T11:00:17+5:30
Natural ways to improve eyesight :लाइफस्टाईलमध्ये बदल करून आणि डोळ्यांचे काही व्यायाम करून डोळे चांगले राहू शकतात. तुमचा चष्माही दूर होऊ शकतो. याबाबत या लेखात आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
Natural ways to improve eyesight : आजकाल कमी वयातच लोकांचे डोळे खराब होऊन किंवा नजर कमजोर होऊ चष्मा लागतो. अनेकजण वर्षानुवर्षे चष्मा वापरतात. पण त्यांना चष्मा दूर करण्याचे सोपे उपाय माहीत नसतात. आहारात बदल करून, लाइफस्टाईलमध्ये बदल करून आणि डोळ्यांचे काही व्यायाम करून डोळे चांगले राहू शकतात. तुमचा चष्माही दूर होऊ शकतो. याबाबत या लेखात आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
डोळ्यांची दृष्टी वाढवा
डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी पोषक तत्व असलेले भरपूर खाद्य पदार्थांचं सेवन करावं. ज्यांनी डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहू शकेल. व्हिटॅमिन ए, सी, ई, झिंक आणि सेलेनियम सारखे पोषक तत्व, ल्यूटिन आणि जेक्सेथिनसारखे कॅरोटिनॉयडसोबत मिळून वयाशी संबंधित डोळ्यांचे आजार आणि निळ्या प्रकाशापासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव होऊ शकतो. तुम्ही हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रूट्स, सी फूड्स आणि फळांचं सेवन करा.
धुम्रपान सोडा
धुम्रपानामुळे डोळ्यांवर खूप वाईट प्रभाव पडतो आणि यामुळे मॅक्युलर डिजनरेशन, मोतिबिंदू, ग्लूकोमा, डायबिटिक रेटिनोपॅथी आणि ड्राय आय सिंड्रोमसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे ही सवय लवकर सोडलेली बरी.
स्क्रीन टाईम कमी करा
जास्त वेळ स्क्रीनच्या संपर्कात राहिल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा, तणाव आणि थकव्यासारख्या समस्या होतात. कारण निळ्या प्रकाशाने रेटिना आणि झोपेची समस्या होते. अशात स्क्रीन टाईम कमी करा आणि डोळ्यांवर येणारा तणाव कमी करण्यासाठी ब्रेक घ्या.
हायड्रेटेड रहा
डिहायड्रेशनमुळे डोळे कोरडे होतात, चिडचिडपणा वाढतो आणि शरीरात थकवा जाणवतो. डोळे हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि या लक्षणांपासून बचाव करण्यासाठी पुरेशी झोप घ्या आणि तरल पदार्थांचं सेवन करा.
प्रोटेक्टिव आय विअर
बाहेर जाताना UV सुरक्षा असलेल्या गॉगल्सचा वापर करा. पुरेशी झोप डोळे चांगले ठेवण्यासाठी महत्वाची आहे. झोप कमी घेतल्याने डोळ्यांवर तणाव, थकवा वाढतो.