हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी नियमित खा हे सुपरफूड, कधीच जाणवणार नाही रक्ताची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 02:04 PM2022-07-20T14:04:25+5:302022-07-20T14:04:46+5:30

Foods For Anemia: जर शरीरात रक्त कमी झालं तर आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, चक्कर येणे, शरीरात सुस्ती आणि पुन्हा पुन्हा थकवा जाणवणे.

How to increase hemoglobin: Foods, home remedies, and more | हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी नियमित खा हे सुपरफूड, कधीच जाणवणार नाही रक्ताची कमतरता

हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी नियमित खा हे सुपरफूड, कधीच जाणवणार नाही रक्ताची कमतरता

googlenewsNext

Foods For Anemia: आजकाल चांगला आहार न घेतल्याने शरीरात रक्ताची कमतरता जाणवते आणि ही समस्या महिलांमध्ये जास्त बघायला मिळते. कारण  दर महिन्यात महिलांना मासिक पाळीचा सामना करावा लागतो. मनुष्याच्या शरीरात रक्ताचं काम तसंच असतं, जसं गाडीत पेट्रोल टाकल्यावर गाडी चालते. पेट्रोल संपलं की, गाडी थांबते. त्याचप्रमाणे शरीरात रक्तप्रवाह सुरू राहणं फार महत्वाचं आहे. जर शरीरात रक्त कमी झालं तर आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, चक्कर येणे, शरीरात सुस्ती आणि पुन्हा पुन्हा थकवा जाणवणे. चला जाणून घेऊन शरीरात रक्त कमी झाल्यावर काय संकेत मिळतात आणि ही समस्या कशी दूर करावी.

खजूरचं सेवन करा

रक्ताची कमतरता झाल्यावर शरीरात कमजोरी येऊ लागते आणि याचं खरं कारण शरीरात आयर्नची कमतरता आहे. ज्यामुळे चक्कर येते, डोकं चक्रावतं, हात-पाय थरथरतात. अशात तुम्ही खजूराचं सेवन केलं पाहिजे. 1 महिना रोज काही प्रमाणात खजूराचं सेवन केलं तर तुमची ही समस्या दूर होईल. तुमची शरीराची ताकद वाढेल. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

मनुक्याचं सेवन

मनुक्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. यात आयर्न भरपूर प्रमाणात असतात. हे अनेकदा ज्यूससोबत, सकाळी ओट्ससोबत किंवा रात्री भिजवून ठेवून सकाळी रिकाम्यापोटी याचं सेवन करता येतं. मनुक्यात साधारण 3.3 ग्रॅम फायबर असतं. ज्याच्या सेवनामुळे आतड्यांची समस्या दूर होते.

तिळाचं सेवन करा

तिळ शरीरासाठी फार फायदेशीर असतात. त्यामुळेच फार पूर्वीपासून लोक उत्सवात तिळ आणि गूळाचं सेवन करतात. यातील भरपूरपर प्रमाणात आयर्न, फ्लेवोनाइड, कॉपर आणि इतर पोषक तत्व असतात. ज्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

Web Title: How to increase hemoglobin: Foods, home remedies, and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.