शरीरावर दिसत असतील ही लक्षणं तर वेळीच डॉक्टरांना भेटा, फार जास्त वाढलं आहे इन्सुलिन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:47 PM2023-07-28T15:47:18+5:302023-07-28T15:47:55+5:30

Insulin Resistance: अनेकदा पॅक्रियाज इन्सुलिन बनवता राहतो. पण मसल्स, फॅट किंवा लिव्हरमधील सेल्सवर याचा प्रभाव पडत नाही. याच कारणाने जास्त इन्सुलिनची निर्मिती होऊ लागते.

How to increase insulin sensitivity naturally told by dietician | शरीरावर दिसत असतील ही लक्षणं तर वेळीच डॉक्टरांना भेटा, फार जास्त वाढलं आहे इन्सुलिन

शरीरावर दिसत असतील ही लक्षणं तर वेळीच डॉक्टरांना भेटा, फार जास्त वाढलं आहे इन्सुलिन

googlenewsNext

Insulin Resistance:  पोटाच्या मागे एक ग्लॅंड असतो ज्याला पॅंक्रियाज म्हटलं जातं. हा पचन तंत्राचा मुख्य भाग आहे जो दोन महत्वाची कामे करतो. यातून अन्न अब्जॉर्ब करणारं एंजाइम आणि शुगर कंट्रोल करणारं हॉर्मोन बनतं. हे इन्सुलिन हॉर्मोन ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतं.

अनेकदा पॅक्रियाज इन्सुलिन बनवता राहतो. पण मसल्स, फॅट किंवा लिव्हरमधील सेल्सवर याचा प्रभाव पडत नाही. याच कारणाने जास्त इन्सुलिनची निर्मिती होऊ लागते. ज्याला इन्सुलिन रेजिस्टेंस म्हटलं जातं. या स्थितीत शरीरात इन्सुलिन असूनही शुगर 200 च्या पार होते आणि डायबिटीस बनते.

इन्सुलिन रेजिस्टेंसची लक्षण

डायटिशिअन मनप्रीतने इन्सुलिन रेजिस्टेंसची 4 मुख्य लक्षणं सांगितली आहे. पोट बाहेर येणं, मान काळी पडणं, शरीरावर छोट्या छोट्या चामखीळी होणं आणि बगलेत काळपटपणा येणं या आजाराचे संकेत आहेत. यावर उपचार करण्यासाठी 5 मायक्रोन्यूट्रिएंट्स नक्की घ्या.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी इन्सुलिन रिसेप्टरला रेग्युरेट करतं, ज्यामुळे इन्सुलिन रेजिस्टेंस घटू लागतं. सकाळी 9 ते 11 वाजता दरम्यानची उन्ह तुम्ही घेऊ शकता.

व्हिटॅमिन बी 12

व्हिटॅमिन बी 12 एंडोथेलिअल फंक्शन वाढवतं. याच्या मदतीने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. दही-पनीर खाऊन तुम्ही हे पोषक तत्व मिळवू शकता.

मॅग्नेशिअम

मॅग्नेशिअम ग्लूकोज मेटाबॉलिज्म सुधारतं. ज्यामुळे इन्सुलिनची लेव्हल नियंत्रित राहते. हिरव्या पालेभाज्या, काजू, केळी यातून तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट मिळतात.

व्हिटॅमिन ई 

हे व्हिटॅमिन स्किन आणि केसांना हेल्दी बनवतं. हे तुम्हाला सूर्यफुलाच्या बिया, बदाम आणि शेंगदाण्यांमधून मिळतं. याच्या मदतीने ऑक्सीडेटिव स्ट्रेस आणि इंफ्लामेशनही कमी होतं.

क्रोमियम

क्रोमियम एक महत्वाचं मिनरल आहे. जे कार्बोहाइड्रेट, प्रोटीन आणि फैट तोडण्याचं काम करतं. हिरव्या पालेभाज्या आणि ब्रॉकलीमध्ये हे भरपूर असतं.

Web Title: How to increase insulin sensitivity naturally told by dietician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.