पावसाळ्यात किडनी डॅमेज करू शकतात बॅक्टेरिया, बचावासाठी फॉलो करा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 01:29 PM2023-07-12T13:29:26+5:302023-07-12T13:31:24+5:30

Kidney Care Tips: लोकांना दूषित पाणी आणि अन्नाच्या संपर्कात आल्याने एक्यूट किडनी इन्जरीचा धोका असतो. या दिवसात बॅक्टेरिअल इन्फेक्शन लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो.

How to keep your kidneys healthy follow these effective tips during monsoon | पावसाळ्यात किडनी डॅमेज करू शकतात बॅक्टेरिया, बचावासाठी फॉलो करा या टिप्स

पावसाळ्यात किडनी डॅमेज करू शकतात बॅक्टेरिया, बचावासाठी फॉलो करा या टिप्स

googlenewsNext

Kidney Care Tips: पावसाळा आला की, वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. पाऊस आल्याने अर्थातच उकाडा कमी झालाय. पण या दिवसात इम्यून सिस्टीम फार जास्त कमजोर होत असतं. ज्यामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका जास्त वाढतो. खासकरून याचा प्रभाव किडनीच्या आरोग्यावरही पडतो. जर काळजी घेतली नाही तर तुम्हाला किडनीसंबंधी रोगांचाही धोका अधिक असतो.

लोकांना दूषित पाणी आणि अन्नाच्या संपर्कात आल्याने एक्यूट किडनी इन्जरीचा धोका असतो. या दिवसात बॅक्टेरिअल इन्फेक्शन लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. ज्यामुळे किडनी डॅमेज होण्याची शक्यता असते. तसेच पावसाळ्यात डेंग्यू, टायफाइड, डायरिया, हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस बी चा जास्त धोका असतो. याने किडनीला धोका वाढतो.

कर्मा आयुर्वेदाचे फाउंडर- डायरेक्टर डॉक्टर पुनीत यांच्यानुसार, मॉन्सूनमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणं दिसल्यावर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. हे ध्यानात ठेवा की, वेळीच उपचार केले तर किडनी फेल होण्यासोबतच इतरही आजारांचा धोका टाळता येतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी खालील गोष्टी करू शकता.

तरल पदार्थांच अधिक करा सेवन

किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी आणि इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी तुम्हाला पाणी व इतर तरल पदार्थांच अधिक सेवन करावं लागेल. हेही लक्षात ठेवा की, पावसाळ्यात पाणी उकडून कोमट करून प्यावं. त्याशिवाय तुम्ही फ्रूट ज्यूसचं आणि छाससारख्या पेय पदार्थांचं अधिक सेवन करू शकता.

हात स्वच्छ ठेवा

साचलेल्या पाण्यात स्वीमिंग करणं किंवा ते पाणी पिणं टाळा. तसेच हात सतत साबणाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवावे. डासांना रोखण्यासाठी काही केमिकल्सचा वापर करा. जेणेकरून डासांपासून पसरणारे आजार रोखता येतील.

अन्न चांगलं शिजवा

पावसाच्या दिवसात खाद्य-पदार्थांना कीड लागण्याची शक्यता असते. त्यामुळे यादरम्यान इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी खाण्याचे पदार्थ चांगले धुवा आणि चांगले शिजवा. हा नुकसानकारक बॅक्टेरिया मारण्याचा चांगला उपाय आहे.

आजारी लोकांपासून दूर रहा

आजारी लोकांच्या संपर्कात येण्यापासून टाळा. लसीकरण केल्यास तुम्हाला या आजारांपासून वाचण्यास मदत मिळेल.

कोणत्याही लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष

जर तुम्हाला किडनीसंबंधी कोणतीही समस्या असेल, तर याच्या कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणं दिसताच वेळीच डॉक्टरांडे जा. हे लक्षात ठेवा की, किडनी फार नाजूक अवयव आहे. त्यामुळे इन्फेक्शनपासून वाचवण्याचा प्रयत्न करा.

Web Title: How to keep your kidneys healthy follow these effective tips during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.