मस्का मारके 'बटर' खाण्याची सवय आहे? मात्र भेसळयुक्त बटर ठरेल जीवाशी खेळ, असे ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 03:30 PM2022-02-06T15:30:31+5:302022-02-06T15:35:23+5:30

बाजारात नकली लोण्याची सर्रास विक्री सुरूंय. बनावट लोणी वापरल्याने अनेक आजारही होण्याची भिती नाकारता येत नाही.

how to know adulteration in butter Food Safety and Standard Authority of India (FSSAI) tells the trick through Instagram post | मस्का मारके 'बटर' खाण्याची सवय आहे? मात्र भेसळयुक्त बटर ठरेल जीवाशी खेळ, असे ओळखा

मस्का मारके 'बटर' खाण्याची सवय आहे? मात्र भेसळयुक्त बटर ठरेल जीवाशी खेळ, असे ओळखा

googlenewsNext

लोणी शरीरासाठी आरोग्यवर्धक मानलं जातं. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडनं लोण्याची विक्री केली जाते. पण तुम्हाला माहितीये का? हेच लोणी तुमच्या जिवावरही बेतू शकतं. कारण बाजारात नकली लोण्याची सर्रास विक्री सुरूंय. बनावट लोणी वापरल्याने अनेक आजारही होण्याची भिती नाकारता येत नाही.

लोणी अर्थात बटर म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. स्वादिष्ट जेवणासाठी गृहिणी हमाखास लोण्याचा उपयोग करतात. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा आवडता नाश्ता म्हणजे ब्रेड आणि बटर. पण जरा थांबा. हेच लोणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. एका माहितीनुसार बनावट लोण्यामुळे आजारांचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे हानीकारक लोणी खाल्ल्यानं कॅन्सर, डायबिटीजसारखे आजार बळावतायेत. (know how to check pure and adulterated butter)

अशा नकली लोण्यात जास्त प्रमाणात फॅट असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तप्रवाहात अडथळे येऊन ह्दयविकारचा धोका वाढतो. याशिवाय रूग्णाला डायबिटीजचाही सामना करावा लागू शकतो. लोण्याचं अतिसेवन केल्यास शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं. चरबी वाढल्यानं इतरही व्याधी वाढू शकतात. त्यामुळे नकली लोण्यापासून प्रत्येकानं सावध राहायला हवं. असली आणि नकली लोण्यातला फरक घरच्या घरीही सहज ओळखता येतो. भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण म्हणजेच FSSAI नं याबद्दल त्यांच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. (Food Safety and Standards Authority of India)

कसं ओळखाल भेसळयुक्त लोणी?

पाण्यानं भरलेले दोन काचेचे बाऊल घ्या. दोन्ही बाऊलमध्ये अर्धा-अर्धा चमचा लोणी टाका. त्यानंतर दोन्ही बाऊलमध्ये तीन ड्रॉप आयोडीन सोल्यूशन टाका. शुद्ध लोण्याचा रंग बदलणार नाही. मात्र बनावट आणि भेसळयुक्त लोण्याचा रंग निळसर होईल.  त्यामुळे आपलं आरोग्य बिघडू नये असं वाटत असेल तर वेळीच सावध व्हा. नकली लोण्याला जास्त मस्का लावू नका. नाहीतर जीवावर बेतेल.

Web Title: how to know adulteration in butter Food Safety and Standard Authority of India (FSSAI) tells the trick through Instagram post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.