Coconut oil adulteration: तुम्ही वापरत असलेल्या खोबरेल तेलातील भेसळ कशी ओळखाल? वापरुन पाहा या सोप्या ट्रिक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 05:09 PM2022-02-17T17:09:02+5:302022-02-17T17:11:07+5:30

आपण घरी वापरत असलेले खोबरेल असली आहे की नकली या तपासणी करणं (Ways to check adulteration in coconut oil) गरजेचं आहे.

how to know adulteration in coconut oil use this simple tricks | Coconut oil adulteration: तुम्ही वापरत असलेल्या खोबरेल तेलातील भेसळ कशी ओळखाल? वापरुन पाहा या सोप्या ट्रिक्स

Coconut oil adulteration: तुम्ही वापरत असलेल्या खोबरेल तेलातील भेसळ कशी ओळखाल? वापरुन पाहा या सोप्या ट्रिक्स

googlenewsNext

अन्न पदार्थांची चव वाढवण्यापासून ते केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. खोबरेल तेल (coconut oil) अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्याचे काम करते. पण, हे खोबरेल तेल भेसळयुक्त (adulteration ) असेल तर आरोग्य चांगले राहण्याऐवजी बिघडू शकते. त्यामुळे आपण घरी वापरत असलेले खोबरेल असली आहे की नकली या तपासणी करणं (Ways to check adulteration in coconut oil) गरजेचं आहे.

खोबरेल तेलात भेसळ शोधण्यासाठी या टिप्स फॉलो करा-
फ्रीजिंग टेस्ट

खोबरेल तेलाची शुद्धता तपासण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. फ्रीझिंग टेस्ट करण्यासाठी, प्रथम एका पारदर्शक ग्लासमध्ये खोबरेल तेल घ्या आणि सुमारे ३० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. जर तेल ३० मिनिटांनंतर गोठले नाही तर याचा अर्थ खोबरेल तेलात भेसळ झाली आहे.

चव घेऊन जाणून घ्या
खोबरेल तेलातील भेसळ तपासण्यासाठी तुम्ही ते चाखून तपासू शकता. ही चाचणी करण्यासाठी, सर्वप्रथम खोबरेल तेल चाखून घ्या आणि चव पहा, जर तुम्हाला त्याची चव किंवा सुगंध थोडासा वेगळा दिसला, तर याचा अर्थ असा की त्यात भेसळ आहे.

तेल स्वच्छ आहे की नाही
खोबरेल तेलाची शुद्धता शोधण्याचा हा एक सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुमचे खोबरेल तेल अगदी स्वच्छ दिसत असेल तर याचा अर्थ ते भेसळयुक्त तेल नाही पण तेलात भेसळ झाली असेल तर ते स्वच्छ किंवा स्पष्ट दिसणार नाही. जर तुम्हाला तेलात थोडासा धुसरपणा दिसला तर समजून घ्या की तेलाच्या गुणवत्तेशी छेडछाड झाली आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा-
बाजारात मिळणारे सुट्टे खोबरेल तेल कधीही घेऊ नका. असे तेल आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

नेहमी FSSAI चिन्ह असलेले तेल खरेदी करा. हे तेलाची शुद्धता दर्शवते.
आपल्या नेहमीच्या खात्रीशीर दुकानदाराकडून तेल खरेदी केले असले म्हणून ते बनावट, भेसळयुक्त असणार नाही, असे होत नाही. तुमची ही धारणा बदला आणि तेल विकत घेतल्यानंतर लगेच तपासूv पाहायला हवे की त्यावर FSSAI मार्क आहे का.

Web Title: how to know adulteration in coconut oil use this simple tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.