दिवाळीला घरीच तयार करा सुगंधी उटणे, जाणून घ्या फायदे....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 11:07 AM2022-10-18T11:07:29+5:302022-10-18T11:07:35+5:30

आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र अलिकडे काही उटण्यांमध्ये केमिकल्सही वापरले जातात. त्यामुळे आम्ही घरच्या घरी उटणे कसे तयार करावे हे तुम्हाला सांगणार आहोत.

How to make homemade Sugandhi utane | दिवाळीला घरीच तयार करा सुगंधी उटणे, जाणून घ्या फायदे....

दिवाळीला घरीच तयार करा सुगंधी उटणे, जाणून घ्या फायदे....

googlenewsNext

दिवाळी म्हटली की, रोषणाई, सजावट आणि फराळासोबत उटणेही तितकेच महत्त्वाचे. पहाटे पहाटे उटणे लावून आंघोळ करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण पूर्वी हे उटणे अनेकजण घरीच तयार करत होते. आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र अलिकडे काही उटण्यांमध्ये केमिकल्सही वापरले जातात. त्यामुळे आम्ही घरच्या घरी उटणे कसे तयार करावे हे तुम्हाला सांगणार आहोत.

उटणे हा अगरू, चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेला एक लेप आहे. हा अंगासा लावल्याने केल्याने शरीर/चेहरा स्वच्छ होतो. कांती उजळते. अंगास सुगंध येतो. जुन्या काळात सहजगत्या उपलब्ध असणारे कस्तुरी आणि केशर हे पदार्थ सध्या सहज उपलब्ध नाहीत. उपलब्ध झाल्यास ते बरेच महाग आहेत.

त्यास पर्याय म्हणून आजकाल कापूरकाचऱ्या, बावची, गुलाबाच्या सावलीत वाळवलेल्या पाकळ्यांची पावडर, वाळ्याच्या मुळ्यांची पावडर, हळद पावडर, अर्जुन वृक्षाच्या वाळून गळून पडलेल्या सालीची पावडर इत्यादी सुगंधी व औषधी वनस्पती वापरून उटणे तयार करतात. यास दुधात घट्ट भिजवून त्यात थोडे तिळाचे तेल टाकून मग अंगाला लावतात. हा लेप मग वाळण्यापूर्वी रगडून काढतात. चेहर्‍यास लावलेला लेप रगडून न काढता हलके हाताने काढतात.

पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पद्धत मागे पडली आहे. दिवाळीच्या वेळेस बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात. ही उटणी पाण्यात भिजवून नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नापूर्वी अंगाला लावतात.

उटणं लावून आंघोळ करण्याचे फायदे-

त्वचा कोरडी पडत नाही

उटणं लावून आंघोळ केल्यानं त्वचा कोरडी पडत नाही. आंबेहळद त्वचा मऊ ठेवण्यासाठी मदत करते. 

त्वचा उजळते

उडण्याने त्वचा उजळते कारण त्यात मसूरची डाळ असते. मसूरची डाळ ही त्वचेसाठी किंवा त्वचा उजळ ठेवण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक क्रिममध्ये मसूरच्या दाळीचा वापर करत असतात.

अंगावरील केस दूर होतात

उटणं लावून आंघोळ केल्यानं अंगावरील केस निघतात. कारण आपण उटणं अंगाला लावल्यावर घासून काढतो. त्या घासण्यामुळे अंगावरील मळ आणि केसही निघतात.

घरी उटणं करण्याची सोपी पद्धत-

मसूर डाळ पीठ - 110 ग्रॅम
आवळकाठी - 10 ग्रॅम
सरीवा - 10 ग्रॅम
वाळा - 10 ग्रॅम
नागर मोथा - 10 ग्रॅम
जेष्टमध - 10 ग्रॅम
सुगंधी कचोरा - 10 ग्रॅम
आंबेहळद   -  2 ग्रॅम
तुलसी पावडर - 10 ग्रॅम
मंजीस्ट -  10 ग्रॅम
कापूर - 2 ग्रॅम

या पदार्थांचं बारीक मिश्रण तयार करुन तुम्ही घरीच उटणे तयार करु शकता.

Web Title: How to make homemade Sugandhi utane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.