लिव्हरला कधीच समस्या होऊ द्यायच्या नसेल तर काय खावं? जाणून घ्या बेस्ट उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 06:02 PM2024-02-12T18:02:45+5:302024-02-12T18:04:29+5:30
लिव्हर आपल्या शरीरातील रक्त प्रक्रिया नियंत्रित करण्यासही मदत करतं त्यातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.
शरीरातील सगळ्याच अवयवांचं आपापलं महत्वाचं काम आहे. त्यातीलच एक महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. पचनक्रिया, मेटाबॉलिज्म, इम्यूनिटी आणि पोषक पदार्थांचं स्टोरेज यात महत्त्वाची भूमिका लिव्हरची असते. तसेच लिव्हर आपल्या शरीरातील रक्त प्रक्रिया नियंत्रित करण्यासही मदत करतं त्यातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.
शरीरात लिव्हर काय करतं?
शुगरच्या स्वरूपात ऊर्जा साठवणं, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे लिव्हर पार पाडतं. त्यासोबतच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे, आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे, निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासून बिलिरुबिनची निर्मीती करणे, तसेच पित्त रस तयार करून त्या व्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं कामही लिव्हर करतं.
अशात लिव्हर हा अवयव निरोगी ठेवणं आपल्यासाठी फार गरजेचं असतं. कारण या समस्यांमुळे शरीरात इतरही अनेक समस्या होतात. ज्यामुळे तुमच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. अशावेळी काही असेही नैसर्गिक उपाय आहेत ज्यांव्दारे तुम्हाला लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत मिळू शकते.
लसूण
लिव्हर साफ करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. याने लिव्हरमधील एंजाइम्सला अॅक्टिव्हेट करण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच यात एलिसिन आणि सेलेनियम नावाचे दोन नैसर्गिक कपांऊड आढळतात, जे लिव्हर-क्लीनिंग प्रोसेस आणखी चांगली करतात. त्यासोबतच लसूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड लेव्हल्सला कमी करतो.
पपनस
पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा असे आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो असे म्हणतात. पपनसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, पेक्टिन आणि अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे लिव्हर क्लीनिंग प्रोसेसमध्ये मदत करतात. सोबतच यात ग्लूटेथिओन नावाचं प्रभावी अॅंटीऑक्सिडेंट आढळतं जे फ्री रेडिकल्स निकामी करतं आणि लिव्हरला डिटॉक्सीफाय करतं.
बीट
बीट हे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि याच्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत करतं. यात भरपूर प्रमाणात प्लांट फ्लावनॉयड्स आणि बीटा-कॅरोटीन आढळतात जे लिव्हरची क्रिया ठिक करतं. सोबतच बीट हे रक्त शुद्ध करण्यासाठीही फायदशीर फळ आहे. त्यामुळे रोज जेवण करताना या आहारात समावेश करावा.
लिंबू
लिंबू पाणीही लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतं. कारण यात डी-लायमोनीन अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. तसंच लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे लिव्हरला पचनक्रिया वाढवणारे एंजाइम्स तयार करण्यास मदत करतं.