तुम्हालाही सतत डोकेदुखीची समस्या होत असेल तर लगेच हे 5 पदार्थ खाणं सोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 03:19 PM2022-12-21T15:19:28+5:302022-12-21T15:19:40+5:30

Foods to avoid headache/migraine: उदाहरण द्यायचं तर तुम्ही जर काही खाल्लं तर त्याच्या अर्ध्या तासानंतर डोकेदुखी सुरू होते. म्हणजे तुम्ही जे खाता त्यातील एखादं तत्व याला कारणीभूत असतं. चला जाणून घेऊ सतत होणाऱ्या डोकेदुखीची इतर काही कारणे...

How to prevent headache migraine in winters headache | तुम्हालाही सतत डोकेदुखीची समस्या होत असेल तर लगेच हे 5 पदार्थ खाणं सोडा

तुम्हालाही सतत डोकेदुखीची समस्या होत असेल तर लगेच हे 5 पदार्थ खाणं सोडा

Next

Foods to avoid headache/migraine: डोकेदुखी ही समस्या कुणालाही होऊ शकते. बऱ्याच केसेसमध्ये संबंधित व्यक्तीचं डोकं दुखण्याचं कारण त्यांची खराब लाईफस्टाईल आणि खाणंपिणं असतं. अमेरिकेपासून यूरोपमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, लोकांमध्ये 25 टक्के डोकेदुखीचं कारण त्यांची खराब खाण्या-पिण्याची चुकीची सवय असते. उदाहरण द्यायचं तर तुम्ही जर काही खाल्लं तर त्याच्या अर्ध्या तासानंतर डोकेदुखी सुरू होते. म्हणजे तुम्ही जे खाता त्यातील एखादं तत्व याला कारणीभूत असतं. चला जाणून घेऊ सतत होणाऱ्या डोकेदुखीची इतर काही कारणे...

कॅफीन

नुकत्याच आलेल्या एका मेडिकल रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात कॅफीनचं  किंवा चहाचं सेवन केलं तर याने डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होऊ शकते. अशात तुम्ही तुमच्या डाएटवर लक्ष दिलं पाहिजे.

एमएसजी

एमएसजी म्हणजे मोनो सोडिअम ग्लूटामेटच्या सेवनानेही मायग्रेन ट्रिगर करतं. एमएसजी नावाचं हे स्लो पॉयझन स्वस्त नूडल्स, चायनीज फूड आणि रेडिमेड सूप पावडर बनवण्यात खूप वापरलं जातं. जेणेकरून हे पदार्थ लवकर खराब होऊ नये.

अल्‍कोहल

सतत डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होत असेल तर याचं एक मुख्य कारण अल्कोहल असतं. अल्कोहल, मायग्रेन आणि डोकेदुखीची वेदना ट्रिगर करण्याचं काम करतं. नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार, 40 टक्के लोक अल्कोहलचं जास्त सेवन करून मायग्रेनच्या जोरात वेदनेचे शिकार झाले आहे.

आर्टिफिशियल स्‍वीट

जर तुम्ही शुगर किंवा प्री डायबिटिक होण्यापासून वाचण्यासाठी आपल्या प्लेटमध्ये किंवा चहाच्या कपात आर्टिफिशियल स्‍वीटनरचा वापर करत असाल तर हेही डोकेदुखीचं कारण ठरू शकतं. त्यामुळे आर्टिफिशियल स्‍वीटनरचा वापर करण्यात आलेले सगळे पदार्थ टाळा.

Web Title: How to prevent headache migraine in winters headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.