Belly Fat : वाढलेलं पोट कमी करण्यासाठी खास उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:30 PM2022-02-23T17:30:09+5:302022-02-23T17:30:28+5:30

Belly Fat Reduce : तुम्ही कोणते उपाय कराल त्यात नियमितता असणं गरजेची आहे. केवळ दोन दिवसात तुमचं बाहेर आलेलं पोट आत जाणार नाही. मात्र, नेहमीसाठी रोज हे उपाय कराल तर याचा प्रभाव दिसू लागेल. 

How to reduce belly fat, know 5 things for better result | Belly Fat : वाढलेलं पोट कमी करण्यासाठी खास उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!

Belly Fat : वाढलेलं पोट कमी करण्यासाठी खास उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!

googlenewsNext

जर तुम्ही तुमच्या वाढलेल्या पोटाने (Belly Fat) वैतागलेले असाल आणि अनेक प्रयत्न करूनही तुमची पोटावरील चरबी कमी होत नसेल तर आम्ही तुम्हाला काही वेगळे आणि सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही तुमच्या पोटाचा घेर (Belly Fat Reduce) कमी करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही कोणते उपाय कराल त्यात नियमितता असणं गरजेची आहे. केवळ दोन दिवसात तुमचं बाहेर आलेलं पोट आत जाणार नाही. मात्र, नेहमीसाठी रोज हे उपाय कराल तर याचा प्रभाव दिसू लागेल. 

कोमट पाणी प्या - रोज सकाळी उठल्यावर नियमितपणे कोमट पाणी पिण्याची सवय लावा. याने पचनतंत्र तर चांगलं होतंच सोबतच तुमची चरबी कमी होते. सकाळी चहाआधी एक ग्लास कोमट पाण्याचं सेवन करा. नियमितपणे सकाळी कोमट पाणी प्यायल्याने याचे तुम्हाला काही महिन्यात फायदे दिसायला लागतील. एक लक्षात ठेवा पाणी जास्त गरम पिऊ नये. 

मीठ आणि साखरेचं कमी सेवन - साखर असलेला पदार्थ खाऊन लठ्ठपणा अधिक वाढतो आणि मिठातही सोडिअम असतं जे लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतं. अनेक रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, साखरयुक्त पदार्थांशिवाय जास्त मीठ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो.

घाईघाईने खाण्याची सवय सोडा -  खासकरून हिवाळ्यात सतत काहीतरी खाण्याचं मन होतं. पण गरजेचं नाही की, भूक लागल्यावरच असं होतं. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता झाल्यानेही असं होतं. त्यामुळे जेव्हाही काही खाण्याचं मन झालं तर पाणी प्या. पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटत असेल तर काहीतरी खाऊन घ्या. महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवण कधीच घाईघाईने करू नका. हळूवार चावून चावून जेवावं.

फायबर असलेले पदार्थ खा - फायबरमुळे खालेल्लं चांगलं पचतं. ज्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही आणि अॅसिडीटीवरही कंट्रोल राहतो. त्यामुळे फायबर असलेले पदार्थ खावीत. बिस्कीट आणि मैद्यापासून तयार पदार्थ पूर्णपणे टाळा. कारण याने लठ्ठपणा वाढतो.

नियमितपणे एक्सरसाइज - सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे तुम्ही नियमितपणे व्यायाम करायला हवा. बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम फार गरजेचं आहे. शरीराची सतत हालचाल आवश्यक आहे. त्यामुळे अशा काही एक्सरसाइज करा ज्याने पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होईल.

(टिप - वरील लेखातील सल्ल्यांबाबत वेगवेगळ्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. हे उपाय करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
 

Web Title: How to reduce belly fat, know 5 things for better result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.