लहान मुलामध्ये लठ्ठपणा वाढलाय? वेळीच व्हा सावध, होतात 'या' गंभीर समस्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:56 AM2024-05-30T10:56:46+5:302024-05-30T10:57:11+5:30
Child obesity : आजकाल लहान मुलांची फिजिकल अॅक्टिविटीही कमी झाली आहे. त्यामुळे याकडे वेळीच आई-वडिलांनी लक्ष दिलं नाही तर लठ्ठपणामुळे इतर गंभीर समस्यांचा धोका वाढेल.
Obesity cause : आजकाल लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. ज्यामुळे त्यांना जॉइंट्समध्ये आणि कंबरेत वेदना होतात. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची किंवा वजन वाढण्याची मुख्य कारणं जंक फूड, फास्ट फूड, पॅक्ड फूड आणि फ्रोजन फूड आहेत. तसेच आजकाल लहान मुलांची फिजिकल अॅक्टिविटीही कमी झाली आहे. त्यामुळे याकडे वेळीच आई-वडिलांनी लक्ष दिलं नाही तर लठ्ठपणामुळे इतर गंभीर समस्यांचा धोका वाढेल. अशात काही टिप्सचा वापर करून लहान मुलांचं वजन कंट्रोल केलं जाऊ शकतं.
लठ्ठपणा कसा कमी कराल?
फास्ट फूड बंद करा
लहान मुलांचं वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी त्याला फास्ट फूड किंवा जंक फूड देणं बंद करा. त्याऐवजी तुम्ही त्याना हिरव्या पालेभाज्याचे वेगवेगळे पदार्थ आणि फळं खाण्यास द्या. मुलांनी दिवसातून दोन फळं आणि एक हिरवी पालेभाजी खायला हवी.
टीव्ही-मोबाईल बघणं कमी करा
मुलांचा स्क्रीन टाइम आजकाल खूप वाढला आहे. मोबाईल झाला की, टीव्ही आणि टीव्ही झाला की, मोबाईल असं सुरू असतं. फोन, टीव्ही, कॉम्प्युटर जास्त पाहिल्याने मुलांचं वाढण्याची शक्यता असते. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका रिपोर्टनुसार, टीव्हीसमोर जास्त वेळ बसण्याचा अर्थ आहे ओव्हरईटिंग. टीव्ही बघताना त्यांना कळत नाही की, ते किती खात आहेत. ज्यामुळे त्यांच्या शरीरात चरबी जास्त जमा होते.
एक्सरसाइज करायला सांगा
लहान मुलांचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी त्यांना फिजिकल अॅक्टिविटी करण्यास सांगा. यू.एस. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनचा सल्ला आहे की, मुलांना निरोगी ठेवण्यासाठी रोज 1 तास व्यायाम करायला सांगा. मुलांना आवडेल अशा अॅक्टिविटी करायला लावा. मैदानात खेळायला सांगा.
वाढत्या वजनामुळे होणारे नुकसान
लहान मुलांमध्ये वाढलेल्या वजनामुळे अनेक गंभीर समस्या होण्याचा धोका असतो. लहान मुलांना यामुळे टाइप 2 डायबिटीसचा धोका जास्त असतो. तसेच जंक आणि फास्ट फूडमध्ये फॅट व मीठ जास्त असतं. ज्यामुळे मुलांना कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. तसेच ज्या मुलांचं वजन जास्त असतं त्यांना झोपेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.